Video- जेव्हा गर्दीतून ड्रायव्हर मनोज यांना मंचावर घेऊन आला होता वरुण, जुना व्हिडीओ व्हायरल

अभिनेता वरुण धवननं ड्रायव्हर मनोजदादांच्या निधनानंतर एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

varun dhawan, varun dhawan instagram, varun dhawan driver, varun dhawan driver death, varun dhawan instagram post, वरुण धवन, वरुण धवन व्हिडीओ, वरुण धवन ड्रायव्हर, वरुण धवन इन्स्टाग्राम
अभिनेता वरुण धवनचा ड्रायव्हर मनोज साहू यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं.

अभिनेता वरुण धवनचा ड्रायव्हर मनोज साहू यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. त्यामुळे वरुण दुःखात आहे. मंगळवारी वरुण महबूब स्टुडिओमध्ये एका जाहीरातीचं शूटिंग करत होता. त्यावेळी मनोज यांची तब्येत बिघडली. त्यानंतर वरुणनं काम थांबवत त्यांना घेऊन रुग्णालय गाठलं. पण मनोज यांना तो वाचवू शकला नाही. रुग्णालयात पोहोचण्याच्या आधीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. वरुण आणि मनोज यांच्यात खास बॉन्डिंग होत. ज्याची झलक एका व्हिडीओमध्ये दिसत आहे.

मनोज यांच्या निधनानंतर वरुणनं त्याच्या इन्स्टाग्रामवर मनोज यांच्यासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यानं त्याच्या मनोज दादांसाठी खास पोस्टही लिहिली आहे. वरुणनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तो मनोज यांचं कौतुक करताना दिसत आहे. आपल्या आतापर्यंतच्या प्रवासात सोबत असण्यासाठी त्यांचे आभार मानताना दिसत आहे. बोलता बोलता तो मनोज यांना शोधू लागतो. पण ते प्रेक्षकांच्या गर्दीत मागे उभे असतात. त्यावेळी वरुण त्यांचा हात पकडून मंचावर घेऊन येतो आणि सर्वांशी त्यांची ओळख करून देतो.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करताना वरुणनं लिहिलं, ‘मागच्या २६ वर्षांपासून मनोज माझ्या लाइफमध्ये होते. ते माझ्यासाठी सर्वकाही होते. आज हे दुःख मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण मी एवढंच सांगू शकतो, त्यांचा हजरजबाबीपणा, ह्यूमर आणि पॅशन यामुळे ते नेहमीच सर्वांच्या आठवणीत राहतील. मी तुमचा नेहमीच आभारी राहीन. तुम्ही माझं आयुष्य होता मनोज दादा.’

दरम्यान वरुणनं मनोज यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांची जबाबदारी घेतली आहे. वरुणच्या कामाबद्दल बोलायचं तर, लवकरच तो ‘जुग जुग जियो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात वरुणसोबत कियारा अडवाणी, अनिल कपूर, नीतू कपूर आणि मनिष पॉल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय त्याचा ‘भेड़िया’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कृती सेननची मुख्य भूमिका आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Varun dhawan share emotional post for his driver manoj after death mrj

Next Story
“माझे ब्रेस्ट मोठे असते तर…”; नरगिस फाखरीने ओठांवरुन ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी