वरुण धवन होणार बाबा? करवा चौथचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चर्चांना उधाण

वरुण धवन आणि नताशा जानेवारी महिन्यात लग्न बंधनात अडकले आहेत.

varun dhawan, natasha dalal,
वरुण धवन आणि नताशा जानेवारी महिन्यात लग्न बंधनात अडकले आहेत.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. वरुणने त्याची गर्लफ्रेंड नताशा दलालशी जानेवारीमध्ये लग्न केले. वरुण नेहमीच त्याचे आणि नताशाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. नुकताच वरुणने त्याचा आणि नताशाच्या पहिल्या करवा चौथचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, हे फोटो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी नताशा प्रेग्नेंट आहे का? असे प्रश्न वरुणला विचारले आहेत.

रविवारी वरुणने पत्नी नताशासोबत करवा चौथ साजरा केला. त्यानिमित्ताने वरुणने काही फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यावेळी नताशाचे फोटो पाहिल्यानंतर वरुण लवकरच वडील होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

आणखी वाचा : Photo : ‘मुळशी पॅटर्न’चे चाहते जेव्हा ‘अंतिम’चा ट्रेलर बघतात तेव्हा…, सोशल मीडियावर मीम्सचा वर्षाव

आणखी वाचा : ५ हजार कोटी रुपयांचा मालक असूनही ‘या’ कारणामुळे मुलांना एक रुपयाही देऊ शकत नाही सैफ

आणखी वाचा : “चोराला सोडून संन्याशाला फाशी…”,समीर वानखेडे यांच्या प्रकरणात मेघा धाडे संतापली

वरुणने नताशाच्या पोटावर हात ठेवल्याने ती प्रेग्नेंट आहे का असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. वरुण आणि नताशाने २४ जानेवारी रोजी लग्न बंधनात अडकले. त्यांनी अलीबागच्या रिसॉर्टमध्ये कमी पाहूण्यांच्या उपस्थितीत लग्न केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Varun dhawan wife natasha dalal is pregnant netizens ask after karwa chauth pictures went viral dcp

Next Story
प्रत्यक्षाहुनी उत्कट : सण-उत्सवांची ‘व्हर्च्युअल’ प्रतिमा!
ताज्या बातम्या