“तू एका आईचे मन दुखावले आहेस”; वीणाच्या आईने शिवानीला सुनावले

शिवानी आणि रुपालीने वीणाच्या आईची मागितली माफी

shivani rupali
'बिग बॉस मराठी'

‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कुटुंबीयांसाठी विशेष आठवडा साजरा करण्यात येत आहे. घरातील स्पर्धकांचे कुटुंबीय किंवा जवळचे व्यक्ती त्यांना भेटायला येत आहेत. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये किशोरी शहाणे यांचा मुलगा बॉबी, नेहाचा पती नचिकेत, शिवानीचे वडील, हिना आणि वीणाची आई बिग बॉसच्या घरात आल्या होत्या. वीणाच्या आईने काही सदस्यांना त्यांच्या चुका सांगितल्या तर काही सदस्यांची त्यांनी स्तुती केली.

वीणाच्या आईने शिवानीला तिच्याकडून झालेल्या चुका सांगितल्या. त्या शिवानीला म्हणाल्या, “तू वीणाला लाथ मारलीस, वीणाच्या वैयक्तिक गोष्टींवर बोललीस. तुला असं बोलण्याचा काहीच अधिकार नाही. रुपालीसोबत तू वीणाबद्दल जे काही बोलली ते चुकीचे होते. तू असं वागायला नको होतं शिवानी. तुझ्या वैयक्तिक आयुष्यावर कोणी काही बोललं तर तू पण चिडतेस ना? तिने तरी तुझ्या आई वडिलांची माफी मागितली. तू कधी माफी मागितलीस? तू पण एका आईचे मन दुखावले आहेस.”

वीणाच्या आईने रुपालीलाही खडेबोल सुनावले. शिवानी जेव्हा वीणाबद्दल तुझ्याशी बोलत होती तेव्हा तू गप्पपणे सगळं ऐकून का घेतलंस, वीणाला मैत्रीण मानत होतीस तर तू तिला काही उत्तर का नाही दिलंस, असा सवाल त्यांनी केला. हे सगळं ऐकून अखेर शिवानी आणि रुपालीने वीणाच्या आईची माफी मागितली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Veena jagtap mother argues with shivani surve for her behavior in bigg boss marathi 2 ssv

ताज्या बातम्या