‘वेगळी वाट’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

जाणून घ्या कधी आण कुठे

झी टॉकीज नेहमीच वेग वेगळ्या चित्रपटांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात पुढाकार घेत असते. या पावसाळ्यात देखील प्रेक्षकांसाठी एक विशेष चित्रपट भेटीस घेऊन येत आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता ‘वेगळी वाट’ हा हृदयस्पर्शी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

विदर्भातील छोट्या खेड्यात या चित्रपटाची सुरुवात होते. अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या सोनूला (अनया पाठक) शाळा शिकण्यासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लागते. तिचे वडील राम (शरद जाधव ) यांच्यावर आभाळाएवढं मोठं संकट कोसळते. मुसळधार पावसामुळे शेतातील संपूर्ण पीक नष्ट होते. रामला सावकार ४८ तासांच्या आत सर्व कर्ज फेडण्यास सांगतो.

सरकारकडून कोणतीच नुकसान भरपाई मिळत नाही. संपूर्ण कुटुंबावर संकटांचा डोंगर उभा राहतो. या सगळ्या परिस्तिथीवर मात करण्यासाठी सोनू आपल्या वडिलांना मदत करण्याचं ठरवते. पण राम या संकटांवर मात करण्यासाठी एक अनपेक्षित निर्णय घेतो.

आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी सोनू काय करायचं ठरवते? राम संकटांचा डोंगर बघून कोणता अनपेक्षित निर्णय घेतो? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला ‘वेगळी वाट’ चित्रपट पाहायला लागणार.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vegli vat movie will be telecast on zee talkies avb