मुंबईत भर रस्त्यात अभिनेत्रीला लुटलं, पोलीस FIR दाखल करुन घेत नसल्याचा केला आरोप

अभिनेत्रीने स्वत: याबाबत माहिती दिली आहे.

सलमा आगा, मुंबई पुलिस, मुंबई, snatchingh, salma agha snatchingh mumbai police, salma agha, mumbai police, mumbai,

बॉलिवूड अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांना मुंबईत भर रस्त्यात लुटले आहे. चोरांनी बाइकवरुन येऊन त्यांच्या हातातली पैशांची पर्स हिसकावून घेतली. या पर्समध्ये मोबाईल आणि इतर काही महत्त्वाचे सामान होते. ६५ वर्षीय सलमा यांनी मुंबई पोलिसांनी या संदर्भात FIR दाखल करुन घेतला नसल्याचा आरोप केला आहे.

शनिवारी सलमा त्यांच्या वर्सोवा येथील बंगल्यापासून एका दुकानात रिक्षाने जात होत्या. त्याच वेळी दोन चोर बाइकवरुन आले आणि त्यांनी सलमा यांच्या हातातील पर्स चोरुन ते फरार झाले. सलमा लगेच वर्सोवा पोलीस ठाण्यात या बाबात तक्रार नोंदवण्यासाठी पोहोचल्या. पण पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिल्याचा दावा सलमा यांनी केला आहे. ‘माझ्या पर्समध्ये दोन मोबाईल, रोख रक्कम आणि इतक काही महत्त्वाचे सामान होते. पर्स चोरीला गेल्यानंतर मी लगेच वर्सोवा पोलिसात ठाण्यात पोहोचले. तेथील अधिकाऱ्याने FIR दाखल करण्यासाठी तिन तास लागतील असे सांगितले. माझी तक्रार मंगळवारी दाखल करण्यात आली’ अशी माहिती सलमा यांनी माध्यमांना दिली आहे.
आणखी वाचा : बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी क्रांती रेडकरने केलं ट्वीट; म्हणाली…

पुढे त्या म्हणाल्या, ‘आमच्या भागामध्ये हे पहिल्यांदा झालेले नाही. यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत. चोरांकडे महागडी बाइक आहे आणि जेथे माझी पर्स चोरली तेथे शेजारी पोलिसांनी नाकाबंदी केली होती.’

FIR दाखल करण्यास उशिर का झाला असे विचारताच पोलिसांनी ‘आम्ही ज्या दिवशी घटना घडली त्याच दिवशी एफआयआर दाखल करतो. पण अभिनेत्रीकडे वेळ नव्हता. त्या नंतर येतील असे सांगून निघून गेल्या होत्या. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी उत्तर दिले नाही. त्या जेव्हा पोलीस ठाण्यात येतील तेव्हा आम्ही एफआयआर दाखल करु’ असे उत्तर दिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Veteran actress salma agha handbag snatched in mumbai avb

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!
ताज्या बातम्या