आपल्या नैसर्गिक अभिनयाने चित्रपट रसिकांच्या मनावर ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्री म्हणून स्मिता पाटील यांना ओळखले जाते. ८० दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांनी बॉलिवूड गाजवलं. स्मिता पाटील यांनी वयाच्या ३१ व्या वर्षीच जगाचा निरोप घेतला. १३ डिसेंबर १९८६ रोजी त्यांचं निधन झालं. एका मराठी कुटुंबातून आलेल्या स्मिता यांना ‘डस्की ब्यूटी’ म्हणून ओळखलं जायचं. स्मिता पाटील या अनेकदा स्वत:च त्यांचा मेकअप करायच्या, असा खुलासा त्यांचा मेकअप आर्टिस्टने केले होते.

स्मिता पाटील यांचा जन्म पुण्यात झाला. त्यांचे शिक्षणही पुण्यातच झाले होते. स्मिता पाटील यांनी वयाच्या २० व्या वर्षी रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी जवळपास ७५ ते ८० चित्रपटात भूमिका साकारल्या. समांतर या चित्रपटात त्यांनी अगदी उल्लेखनीय काम केले होते. स्मिता पाटील हे नाव ८० च्या दशकात बॉलिवूडमधील मोठे नाव होते. अभिनेत्री म्हटलं की मेकअप हा आलाच. पण स्मिता पाटील यांना मेकअप करण्याची अजिबात आवड नव्हती.

uddhav thackeray eknath shinde devendra fadnavis
“फडणवीसच नव्हे, मविआच्या काळात आणखी तीन भाजपा नेत्यांच्या अटकेचा कट रचलेला”, एकनाथ शिंदेंचा गंभीर आरोप
Amar Singh Chamkila first wife recalls their final meeting
“त्यांनी अमरजोतशी लग्न केलं, पण…” अमरसिंग चमकीलांच्या खुनाबद्दल पहिल्या पत्नीचं विधान; म्हणाल्या, “मला त्यांचा खूप…”
aam aadmi party AAP
आपचे खासदार संजय सिंह यांना मिळालेल्या जामिनाचे कारण काय? त्यांच्या वकिलांकडून नेमका काय युक्तिवाद करण्यात आला?
Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
“तुमच्या जाण्यायेण्याचा खर्च मी करतो, फक्त तुम्ही…”; उद्धव ठाकरे यांची देवेंद्र फडणवीसांना खुली ऑफर

स्मिता पाटील यांचा मेकअप करणारे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी एकदा एका मुलाखतीत याबद्दलचा खुलासा केला होता. यावेळी त्यांनी स्मिता पाटील यांच्या मेकअपबद्दलच्या अनेक गोष्टींवर भाष्य केले. 

स्मिता पाटील या कलात्मक चित्रपटातून व्यावसायिक चित्रपटाकडे वळल्या. त्यांना मेकअप करणे अजिबात आवडत नसे. पण व्यावसायिक चित्रपटांसाठी मेकअप करणे हे गरजेचे असायचे. त्यामुळे त्यांना तो करावा लागायचा. दीपक सावंत यांनी स्मिता पाटील यांचा पहिला मेकअप केला होता. १९८२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘भीगी पलके’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिल्यांदा मेकअप केला.

स्मिता यांचे डोळे खूप बोलके होते. त्यांच्‍या नजरेत वेगळी चमक होती, असे म्हटले जाते. अनेकदा त्या त्यांच्या डोळ्याद्वारे अभिनय करायच्या. यात त्यांचा विशेष हातखंडा होता. त्यावेळी काही चित्रपटांमध्ये अभिनेत्रीना मेकअप असणं किंवा त्या गौरवर्ण दिसणं गरजेचे असायचे. पण स्मिता या ‘डस्की ब्युटी’ होत्या. तिला गोरं करण्यासाठी बराच वेळ आणि कष्ट लागायचे. एकदा मी तिच्या मेकअपमध्ये पिवळा रंग मिक्स केला आणि त्यानंतर तिचा मेकअप केला. यामुळे त्या मेकअपनंतर ती गोरी दिसू लागली.

पण स्मिता पाटील यांना मुळातच मेकअपची आवड नव्हती. त्या मेकअपसाठी अनेकदा निरुत्साही असायच्या. त्या कित्येकदा स्वतःच आपला मेकअप करायच्या. त्या अगदी सहजपणे वापरू शकतील असा मेकअप किट दीपक यांनी त्यांना दिला होता. अनेकदा पार्टीत जाताना किंवा कमी बजेटच्या चित्रपटांसाठी त्या स्वतः मेकअप करायच्या. गोविंद निहलानी यांच्या ‘अर्ध सत्य’ या चित्रपटाचे बजेट कमी होते. मेकअपमनच्या खर्चामुळे चित्रपटाचा बजेट वाढणार होता. स्मिता पाटील यांना निहलानी यांची चिंता समजली. त्यानंतर त्यांनी स्वतः मेकअप करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी दीपक यांनी त्यांना मेकअप कसा करावा याचे प्रशिक्षण दिले होते. त्याबरोबर मेकअपचा किटही दिला होता. 

दरम्यान स्मिता पाटील यांनी घरच्यांचा विरोध पत्करून राज बब्बर यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नानंतर स्मिता गरोदर राहिल्या आणि त्यांनी १३ डिसेंबर १९८६ रोजी मुलगा प्रतीकला जन्म दिला. पण प्रतीकच्या जन्माच्या वेळी स्मिता यांना खूप त्रास झाला. डिलिव्हरीच्या वेळी त्यांची तब्येत खूपच बिघडली. मुलाला जन्म दिल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच स्मिता यांनी वयाच्या ३१ व्या वर्षीच या जगाचा निरोप घेतला.