अवीट चालीच्या गाण्यांनी मराठी संगीतक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांचे दीर्घ आजाराने शुक्रवारी पुण्यात निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. गुरुवारी त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
संगीताकडे बघण्याची सर्जनशील दृष्टी हे आनंद मोडक यांचे वैशिष्ट्य होते. बा. सी. मर्ढेकरांच्या बदकांचे गुपित या काव्याला मोडक यांनी संगीत दिले आणि तेथून त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. हे काव्य रसिकांच्या पसंतीस उतरल्यानंतर मोडक यांनी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांना मोडक यांनी संगीत दिले. घाशीराम कोतवाल, महानिर्वाण, तीन पैशांचा तमाशा, पडघम या नाटकांचे आणि कळत-नकळत, एक होता विदूषक, मुक्ता, चौकटराजा, तू तिथे मी, हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले होते. मोडक यांच्या मृत्यूमुळे मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी
jayant patil govinda eknath shinde
“चालणारा नट…”, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून जयंत पाटलांचा टोला; म्हणाले, “त्यांचा शेवटचा चित्रपट…”