अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांची लगीनघाई सुरु आहे. सध्या त्या दोघांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांनी राजस्थानमधील एका किल्ल्यावर शाहीथाटात ते दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत. विकी-कतरिनाचे लग्न थाटामाटात होणार असलं तरी यावेळी सर्व विधींची तयारी करण्यात आली आहे. काल कतरिना आणि विकीचा मेहंदी सोहळा पार पडला. यावेळी तिच्या मेहंदी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. यासाठी खास राजस्थानच्या सोजतमधून मेहंदी मागवण्यात आली होती.

राजस्थानमधील सोजत हे ठिकाणी मेहंदीच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. या मेहंदी सोहळ्यात कतरिनाला एक अनोखी भेटही मिळाली आहे. ज्यामुळे तिचा हा सोहळा अविस्मरणीय ठरला. कतरिना आणि विकीच्या लग्नासाठी खास सोजतमधून २० किलो ऑर्गेनिक मेहंदी तयार करण्यात आली होती. त्यासोबतच ४०० मेहंदीचे कोनही पाठवण्यात आले. हे सर्व मेहंदी या दाम्पत्याला भेट म्हणून देण्यात आली.

सोजतची मेहंदी तयार करणाऱ्या नॅचरल हर्बल्सचे मालक नितेश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नातील मेहंदीच्या विधींसाठी आम्ही २० किलो मेहंदी दिली आहे. ही मेहंदी सोजतने विकी-कतरिनाला भेट म्हणून दिली आहे. विशेष म्हणजे यासाठी त्यांनी एकही रुपया आकारलेला नाही. ही मेहंदी तयार करण्यासाठी २० दिवसांचा अवधी लागला आहे. यात कोणत्याही प्रकारचे केमिकल मिसळण्यात आलेले नाही.

हेही वाचा : विकी-कतरिनाच्या लग्नात विघ्न, राजस्थान पोलिसांकडे तक्रार दाखल, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

दरम्यान सध्या विकी-कतरिनाच्या हळदी सभारंभाची जोरदार तयारी सुरु आहे. आज ८ डिसेंबर रोजी या दोघांचा हळदी सभारंभ पार पडणार आहे. त्यानंतर संध्याकाळी संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कतरिना आणि विकी ७ ते १२ डिसेंबर दरम्यान लग्न करणार आहेत. या दोघांच्या लग्नाच्या वेळी फक्त कुटुंबातील काही निवडक व्यक्ती आणि मित्र-मैत्रिणी उपस्थित असणार आहेत. सर्व प्रथा परंपरेने लग्न करण्यापूर्वी कतरिना आणि विकीने मुंबईत कोर्ट मॅरेज केल्याचे म्हटले जात आहे.