विकी कौशलचा हा व्हिडीओ पाहिलात का? १३ वर्षांपूर्वी असा दिसायचा अभिनेता

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा १३ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

vicky kaushal, vicky kaushal video, vicky kaushal instagram, vicky kaushal 13 years old video, vicky kaushal viral video, विकी कौशल, विकी कौशल व्हायरल व्हिडीओ, विकी कौशल इन्स्टाग्राम, विकी कौशल व्हिडीओ
एका मैत्रिणीनं शेअर केलेला या व्हिडीओमध्ये विकीच्या अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे.

अभिनेता विकी कौशलनं दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. पण विकीच्या अभिनयाची चुणूक तर १३ वर्षांपूर्वीच दिसली होती. सध्या विकी कौशलचा १३ वर्षांपूर्वीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्याच्या एका मैत्रिणीनं शेअर केलेला या व्हिडीओमध्ये विकीच्या अभिनयाची झलक पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ विकी कौशलच्या मैत्रिणीने इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर काही वेळातच हा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ विकी कौशल शाळेत असतानाचा आहे. या व्हिडीओमध्ये विकी खूपच बारीक दिसत आहे. पण त्याचा अभिनय मात्र त्यावेळी उत्तम असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये डायलॉग्स ऐकल्यावर हे एखादं विनोदी नाटक असल्याचं लक्षात येतं.

विकीच्या मैत्रिणीनं हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलं, ‘शाळेच्या दिवसांतील अभिनय. ही पोस्ट करण्यापूर्वी विकी तुझ्यासमोर हात जोडते. हाहाहा…’ विकी कौशलनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना त्यानं लिहिलं, ‘जुने अभिनयाचे दिवस (२००९)’ म्हणजेच विकीचा व्हिडीओ हा १३ वर्षांपूर्वीचा आहे.

दरम्यान विकी कौशलच्या कामाबद्दल बोलायचं तर तो सध्या इंदोरमध्ये सारा अली खानसोबत त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग करत आहे. चित्रपटाच्या सेटवरील या दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याशिवाय आगामी काळत विकी ‘इमॉर्टल अश्वत्थामा’ ‘सॅम बहादुर’ आणि ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal 13 years old video goes viral on social media mrj

Next Story
‘घटस्फोट हे मृत्यूपेक्षाही वेदनादायी असू शकतो’, धनुष-ऐश्वर्याच्या घटस्फोटानंतर अभिनेत्याचे विधान
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी