कतरिना-विकीच्या लग्नाआधी अभिनेत्याच्या एक्स गर्लफ्रेंडने सांगितली मनातली गोष्ट; पोस्ट होतेय व्हायरल

विकी आणि हरलीन दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते आणि २०१९ मध्ये ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ रिलीज झाल्यानंतर लगेचच वेगळे झाले.

Vicky kaushal Katrina kaif wedding former ex girlfriend harleen sethi share cryptic post

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे त्यांच्या भव्य लग्नासाठी राजस्थानला पोहोचले आहेत. या दरम्यान आता विकीची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विकी आणि हरलीन दीर्घकाळ रिलेशनशिपमध्ये होते आणि २०१९ मध्ये ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ रिलीज झाल्यानंतर लगेचच वेगळे झाले. हरलीनने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये नोट शेअर केली आहे.

विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड हरलीन सेठीच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हरलीन सेठीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमधील नोट शेअर केली आहे. ज्यामध्ये ‘सतत आयुष्याचा अर्थ शोधणे म्हणजे टोस्टचा अर्थ शोधण्यासारखे आहे. कधी कधी फक्त टोस्ट खाणे चांगले असते. लिहिले आहे. हरलीनने या पोस्टमध्ये कोणाचे नाव घेतले नसले तरी, पण सोशल मीडियावर दावा केला जात आहे की, ही पोस्ट तिचा एक्स बॉयफ्रेंड विकीसाठीच आहे.

हरलीन शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या इंस्टाग्रामवर तिचे सर्वोत्तम फोटो शेअर करून सतत चर्चेत असते. विकीने ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल’ फेम हरलीन सेठीला २०१९ पर्यंत डेट केल्याची माहिती आहे. विकी जेव्हा ‘मनमर्जियां’ चित्रपटाचे प्रमोशन करत होता, तेव्हा तो डान्सर आणि मॉडेल हरलीन शेट्टीला डेट करत असल्याचे समोर आले होते.

‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपट रिलीज होण्यापूर्वी विकी-हरलीन वेगळे झाले होते, असे म्हटले जाते. पण त्यांच्या ब्रेकअपचे कारण कोणालाच माहित नाही. दोघांनीही त्याचा कधी उल्लेखही केला नाही. हरलीनने विकीला इंस्टाग्रामवरून अनफॉलो केल्यावर या दोघांच्या ब्रेकअपची ठिणगी पडली. त्यावेळी त्यांच्या ब्रेकअपचे कारण कतरिना आणि विकीची वाढती जवळीक असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या.

दरम्यान, विकी कौशल अभिनेत्री कतरिना कैफसोबत ९ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहे. राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील ‘सिक्स सेन्स फोर्ट’ या हॉटेलमध्ये दोघांचा विवाहसोहळा पार पडणार असून, त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. या शाही विवाहाच्या विधींना सात डिसेंबरपासून संगीत सोहळ्याने सुरुवात झाली आणि आज या जोडप्याचा मेहंदी सोहळा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vicky kaushal katrina kaif wedding former ex girlfriend harleen sethi share cryptic post abn