शूटींग सोडून विकी कौशल खेळतोय क्रिकेट, चौकार-षटकार मारतानाचा व्हिडीओ पाहिलात का?

नुकतंच तो मैदानात क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तो अभिनेत्री कतरिना कैफसोबत विवाहबंधनात अडकला. त्यानंतर आता तो त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगसाठी इंदूरमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आगामी चित्रपटासाठी तो शूटिंग करत असल्याचे बोललं जात आहे. मात्र त्याच्या व्यस्त वेळापत्रकातूनही तो स्वत:साठी वेळ काढताना दिसत आहे. नुकतंच तो मैदानात क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

विकी कौशलच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत तो एका मैदानात क्रिकेट खेळत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यावेळी मैदानात इतरही खेळाडू असल्याचे दिसत आहे. यावेळी विकी हा फलंदाजी करत आहे. त्यात तो छान चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे एक अभिनेता असूनही तो ज्याप्रकारे क्रिकेट खेळत आहे ते पाहून सर्वजण चकित झाले आहेत.

रिया चक्रवर्ती अलिबागच्या व्हिलामध्ये एन्जॉय करतेय सुट्ट्या, एका रात्रीचे भाडे माहितीये का?

अभिनेता विकी कौशलनं दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजही बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. मात्र त्याचा हा अंदाज पाहून चाहते त्याचे कौतुक करत आहेत. त्याचा या व्हिडीओला अनेकांना लाईक केले आहे.

दरम्यान सध्या विकी कौशल हा सारा अली खानसोबत लुका छुपी २ या चित्रपटाचे शूटींग करत आहे. तो सध्या इंदोरमध्ये असून चित्रपटाच्या सेटवरील या दोघांचे बरेच फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याशिवाय आगामी काळत विकी ‘इमॉर्टल अश्वत्थामा’ ‘सॅम बहादुर’ आणि ‘गोविंदा नाम मेरा’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vicky kaushal play cricket in indore during film shooting with sara ali khan watch video nrp

Next Story
‘पुष्पा’नंतर अल्लू अर्जुनचा ‘हा’ चित्रपट होणार हिंदीमध्ये प्रदर्शित, टीझर सोशल मीडियावर चर्चेत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी