scorecardresearch

विकी कौशलने कतरिनासह सप्तपदी घेण्यासाठी केली होती घाई, लग्नाबाबत केला रंजक खुलासा

विकी कौशलनं करण जोहरच्या चॅट शोमध्ये लग्नाबाबत खुलासे केले आहेत.

विकी कौशलने कतरिनासह सप्तपदी घेण्यासाठी केली होती घाई, लग्नाबाबत केला रंजक खुलासा
विकी कौशल कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच या शोमध्ये दिसणार आहे.

प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता करण जोहरचा लोकप्रिय चॅटशो ‘कॉफी विथ करण ७’च्या आगामी एपिसोडमध्ये विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची जोडी पाहायला मिळणार आहे. एकीकडे विकी कौशल कतरिना कैफशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच या शोमध्ये दिसणार आहे. तर दुसरीकडे सिद्धार्थ मल्होत्राही या शोमध्ये त्याच्या लव्ह लाइफबद्दल नवे खुलासे करताना दिसणार आहे.

करण जोहरचा ‘कॉफी विथ करण’ हा चॅट शोमध्ये बॉलिवूड सेलिब्रेटी बरेच खुलासे करताना दिसतात. खासकरून सेलिब्रेटींचं खासगी आयुष्य, लव्ह स्टोरी, बेडरुम सीक्रेट्स या गोष्टींसाठी हा शो ओळखला जातो. करण जोहर या शोमधू बी-टाऊनमध्ये कोणालाच माहीत नसलेले किस्से प्रेक्षकांसमोर आणतो. हा शो आठवड्याच्या प्रत्येक गुरूवारी डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रसारित होतो.
आणखी वाचा-“कियारा आडवाणीशी लग्न करण्याचा काय प्लान?” करणच्या प्रश्नावर सिद्धार्थ मल्होत्रा म्हणतो…

नव्या एपिसोडमध्ये हजेरी लावलेल्या विकी कौशलने या एपिसोडमध्ये कतरिना कैफ आणि त्याच्या लव्ह लाइफबद्दल बरेच खुलासे केले आहेत. कतरिना आणि आपल्या पहिल्या भेटीबद्दल बोलताना विकी म्हणाला, “आम्ही पहिल्यांदा जोया अख्तरच्या घरी भेटलो होतो. तिथून आमच्या लव्हस्टोरीची सुरूवात झाली.” लग्नाच्या आठवणींबद्दल सांगताना विकीने धमाकेदार लग्नसोहळ्यातही त्यांनी मीम्स आणि मजेदार ट्वीट्सवर कसं लक्ष ठेवलं होतं आणि हे सगळं कसं एन्जॉय केलं हे सांगितलं.

विकी कौशल म्हणाला, “सुरक्षेसाठी ड्रोनचा वापर, हेलिकॉप्टरमधून रॉयल एंट्री यांसारख्या अनेक बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्यावेळी आम्ही पाहत होतो. यावेळ मी पंडितजींना सांगितलं होतं की, हा सर्व गोंधळ सुरू आहे तोपर्यंतच लवकरात लवकर आमचं लग्न लावून द्या. एक तासापेक्षा जास्त वेळ घेऊ नका. आणखी छापून येण्याआधी आम्हाला लग्न उरकून घ्यायचं होतं. त्यामुळे आम्ही यासाठी घाई केली होती.

आणखी वाचा- “आता यांना धडा शिकवायलाच हवा…” बॉयकॉट ट्रेंडवर अर्जुन कपूर भडकला

दरम्यान करण जोहरच्या या शोमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट-रणवीर सिंह, जान्हवी कपूर-सारा अली खान, अक्षय कुमार-सामंथा रुथ प्रभु, विजय देवरकोंडा-अनन्या पांडे, आमिर खान-करीना कपूर यांच्यासह सोनम कपूर आणि अर्जुन कपूर यांनीही हजेरी लावली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.