scorecardresearch

कतरिनासोबतच्या लग्नाच्या चर्चा सुरु असताना, पत्नी म्हणून कशी मुलगी पाहिजे विकी कौशलने केला खुलासा

विकीने ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ या शोमध्ये हा खुलासा केला आहे.

vicky kaushal, katrina kaif,
विकीने 'इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ या शोमध्ये हा खुलासा केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल विवाहबंधनांत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा साखरपुडा झाल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर येत्या डिसेंबरमध्ये ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यांच्या लग्नाची तयार सुरु असल्याचे सांगण्यात येत होते. त्यात त्यांचा रोका झाल्याचे ही सांगण्यात येत आहे. या सगळ्यात आता विकीने त्याला कशी मुलगी आवडते याचा खुलासा केला आहे.

विकीने ‘इंटू द वाइल्ड विद बेयर ग्रिल्स’ शोमध्ये दिसणार आहे. यावेळी विकीने त्याच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याचवेळी विकीने त्याच्या लाइफ पार्टनर विषयी सांगितले आहे. ‘इंडिय एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार, विकीने बेअर ग्रिलच्या शोमध्ये सांगितले होते की, त्याचा जन्म एका छोट्या घरात झाला आहे. अभिनयासाठी त्याने इंजिनीअरिंगचं शिक्षण मध्येच सोडलं. त्याला समुद्राच्या खोल पाण्याची भीती वाटते. परंतु विकीने सगळ्यांचे लक्ष तेव्हा वेधले जेव्हा तो त्याच्या होणाऱ्या पत्नी विषयी बोलला.

बेअर ग्रिलने त्याला विचारले की त्याला पत्नीच्या रुपात कशी मुलगी पाहिजे? यावर उत्तर देत विकी म्हणाला, जिच्यासोबत असल्यावर घरी असल्याचा भास होईल, जिच्यासोबत मी कनेक्ट होऊ शकेल. एकमेकांमध्ये असलेल्या कमी आणि चांगल्या गोष्टी माहित असूनही प्रेम करेल आणि समजून घेईल.

आणखी वाचा : “२०१४ पूर्वी कंगना हृतिक आणि आदित्य पांचोलीच्या ताब्यात होती…”, म्हणतं अभिनेत्याने उडवली खिल्ली

‘बॉलिवूड लाईफ’ने दिलेल्या वृत्तानुसार, १ डिसेंबर ते ७ डिसेंबरमध्ये ते दोघेही लग्न करतील असे म्हटलं जात आहे. या दोघांचे लग्न राजस्थानमधील सवाई माधोपूर या ठिकाणच्या सिक्स सेन्सेस राजमहालात आयोजित करण्यात आला आहे. त्या दोघांचा विवाह अलिशान आणि भव्यदिव्य पद्धतीने होणार असल्याचेही बोललं जात आहे.

आणखी वाचा : “तर निक माझा जीव घेईल…”, प्रियांकाला वाटते पतीची भीती

दरम्यान, नुकताच कतरिनाचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कतरिना अक्षयसोबत मुख्य भूमिकेत दिसली होती. तर दुसरीकडे विकीचा ‘उधम सिं’ग हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2021 at 17:51 IST

संबंधित बातम्या