विकी कौशलने शेजाऱ्यांसोबत शेअर केला फोटो, सोशल मीडियावर व्हायरल

फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेला अभिनेता म्हणजे विक्की कौशल. विकीने त्याच्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली असून त्याचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. विकी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून विकी त्याच्या चाहत्यांशी संवाद देखील साधत असतो. तो कधी त्याच्या बालपणीचे फोटो शेअर करतो तर कधी त्याच्या डॅशिंग लूकचा फोटो शेअर करताना दिसतो. नुकताच विकीने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत विकीने त्याच्या शेजाऱ्यांची ओळख करून दिली आहे. विकीचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

विकीने त्याचा हा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. विकीसोबत या फोटोमध्ये एक पाळीव कूत्री दिसत आहे. या कूत्रीच नाव बेला आहे. बेला ही विकीच्या शेजाऱ्यांची पाळीव कूत्री आहे. विकीने हा फोटो शेअर करत “शेजारी… #बेला” असे कॅप्शन दिले आहे. विकी आणि बेलामधील प्रेम पाहून त्याचे चाहते आनंदी झाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

दरम्यान, शूजित सरकार दिग्दर्शित ‘सरदार उधम सिंग’ या चित्रपटात विकी मुख्य भुमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात विश्व सुंदरी मनुषी छिल्लर देखील विकीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vicky kaushal shared a photo with his neighbour went viral dcp 98 avb

ताज्या बातम्या