विकी कौशलने शेअर केला ‘सरदार उधम’च्या सेटवरील जखमी अवस्थेतील फोटो, नेटकरी चिंतेत

सुजित सिरकर दिग्दर्शित हा सिनेमा स्वतंत्र्यसेनानी सरदार उधम सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

vicky-kaushal-sardar-udham
(Photo-Instagram@vickykaushal09)

अभिनेता विकी कौशलचा ‘सरदार उधम’ हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. सुजित सिरकर दिग्दर्शित हा सिनेमा स्वतंत्र्यसेनानी सरदार उधम सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. नुकताच विकी कौशलने या सिनेमाच्या सेटवरील एक फोटो शेअर केलाय. हा फोटो पाहून चाहत्यांची चिंता मात्र वाढली आहे.

विकीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केलाय. यात त्याची उघडी पाठ दिसतेय. तर त्याच्या पाठीवर प्रचंड जखमा आणि व्रण दिसून येत आहेत. मात्र विकीने शेअर केलेल्या या फोटोत त्याच्या पाठीवर दिसत असलेल्या जखमा खऱ्या नसून त्या खोट्या आहेत. हा मेकअप करणाऱ्या मेकआर्टिस्टला देखील विकीने या पोस्टमध्ये टॅग केलंय. मात्र सुरुवातीला विकीचा हा फोटो पाहून अनेक चाहते चिंतेत पडले होते.

KBC 13: “कॉलेजचे ते दिवस आठवले”; अमिताभ बच्चन यांनी क्रिती सेनॉनसोबत केला खास डान्स


विकीच्या या फोटोवर कमेंट करत अनेकांनी या जखम्या खऱ्या आहेत की खोट्या? असा प्रश्न विचारला आहे. तर अनेकांनी त्याच्या सिनेमातील अभिनयाचं कौतुक केलंय.

नुकतच विकी कौशलला कतरिना कैफसोबत सिनेमाच्या प्रिमिअरला स्पॉट करण्यात आलं होतं. विकीने चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘ई-टाइम्स’ला मुलाखत दिली होती. त्यावेळी त्याच्या आणि कतरिनाच्या साखरपुड्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. “तुमच्या मित्रांनी ही बातमी पसरवली आहे. मी सुद्धा लवकरच साखरपुडा करेन, पण त्याची वेळ आल्यावर,” असे विकी म्हणाला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vicky kaushal took to instagram to share a picture of the prosthetic scars kpw

Next Story
गॉसिप
ताज्या बातम्या