Malhar Patekar said 3 things after Nana Patekar Death : नाना पाटेकरांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून जाणारी आहे. नानांचे गुरुवारी (८ ऑक्टोबर २०२६) गोव्यात वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या दुःखद बातमीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. पुण्याजवळील डोणजे येथील ‘नानाची वाडी’ या फार्महाऊसवर रात्री उशिरा शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नियमित व्यायाम आणि उत्तम प्रकृती असतानाही नानांची ही अकाली एक्झिट सर्वांनाच चटका लावून गेली. यानंतर मुलगा मल्हार पाटेकरने माध्यमांशी बोलताना नानांचे सामाजिक कार्य, नाम फाउंडेशनचे हँडओव्हर आणि ३ अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.
७५ वर्षांचे नाना पाटेकर व्यायाम करायचे. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा जिममध्ये व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. अशातच हार्ट अटॅकने त्यांचं निधन झाल्याने सर्वांनाच धक्का बसला. पण त्यांची प्रकृती चांगली होती, असं मल्हारने सांगितलं. “सगळं चांगलं चाललं होतं, त्यांची प्रकृती उत्तम होती, पण दुर्दैव असं की हार्ट अटॅकमुळे हे झालं,” असं मल्हार पाटेकर माध्यमांशी बोलताना म्हणाला.
नाना पाटेकर सगळं काम हँडओव्हर करून गेले – मल्हार पाटेकर
“आश्चर्य वाटेल पण आजवर त्यांनी जे केलं ते सगळं काम हँडओव्हर करून ते गेले. नाम फाउंडेशनमध्ये सुद्धा, निर्मला गजानन फाउंडेशनमध्येही सगळं पुढच्या पिढीला सोपवून गेले. मी परत कुठेतरी जाऊन शून्यातून सुरुवात करतो, असा विचार त्यांच्या डोक्यात होता. तर हे कार्य आता आयुष्यभर सुरू राहो इतकंच. आमच्याकडून ते चालू राहील,” असं मल्हार पाटेकर म्हणाला.
नानांच्या निधनानंतर मल्हारने सांगितल्या तीन गोष्टी
मल्हार पाटेकर पुढे म्हणाला, “पहिली गोष्ट, शारीरिकरित्या आपण सगळेच जाणार आहोत, तसेच आज नानासाहेब गेले. पण त्यांचं कार्य आणि कर्तृत्व असं आहे की नाना साहेबांसारखी व्यक्ती कुठेही जात नसते, आपल्यातच असते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या डोक्यात कायमच ही गोष्ट असायची की, मानवतेसाठी एकत्र येऊया आणि या जगाच्या भल्यासाठी काम करुया, ते जगाच्या प्रमाणावरती विचार करायचे. तिसरी गोष्ट अशी की यापुढचं जे काम आहे, नाम फाउंडेशनचं असो, निर्मला गजानन फाउंडेशनचं असो ते त्यांच्या डोक्यात जे काही होतं ते त्यानुसार केलं जाईल. आयुष्यभर त्यासाठीच काम करायचंय.”
