Video Raj Kundra Making Porn and Shilpa Shetty Bikini Cut Jeans At Manish Malhotra Party People Call Her Urfi Javed | Loksatta

Video: “नवरा पॉर्न मूव्ही काढतो आणि ही उर्फीची…” विचित्र जीन्समुळे शिल्पा शेट्टी झाली तुफान ट्रोल

Shilpa Shetty Viral Video: फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या वाढदिवसाला शिल्पाने बिकिनी कटमध्ये दोन रंगाची जीन्स घातलेली दिसत आहे.

Video: “नवरा पॉर्न मूव्ही काढतो आणि ही उर्फीची…” विचित्र जीन्समुळे शिल्पा शेट्टी झाली तुफान ट्रोल
शिल्पा शेट्टी 'बिकिनी कट', दोन रंगाच्या जीन्समुळे झाली तुफान ट्रोल (फोटो: इंस्टाग्राम)

Shilpa Shetty in two-toned jeans: बॉलिवूड अभिनेत्री या त्यांच्या बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी अनेकदा ट्रोल होत असतात. यात अलीकडे इंस्टाग्राम इन्फ्ल्यूएंसर सुद्धा अनेकांच्या भुवया उंचावण्याचं काम करतात. उर्फी जावेद हे नाव तर तुम्ही ऐकून असालच. शक्य होईल तितकी विचित्र व स्वप्नातही डोक्यात येणार नाही अशा फॅशनसाठी उर्फी ओळखली जाते. याच उर्फीची तुलना आता थेट अभिनेत्री शिल्पा शेट्टीशी केली जात आहे. सोमवारी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा याच्या वाढदिवसाला शिल्पाने घातलेली दोन रंगाची जीन्स पाहून नेटकरी तिला उर्फीची उपमा देत आहेत.

शिल्पा शेट्टीच्या दोन रंगाच्या जीन्सची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. काळा व निळा असे दोन रंग असणारी ही जीन्स घालून शिल्पा नेहमीप्रमाणे कॉन्फिडन्ट व सुंदर दिसत आहे. पण तिची ही निवड नेटकऱ्यांना मात्र अजिबात आवडलेली नाही. व्हायरल भैयानी या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये आपण शिल्पाचा हा भन्नाट फॅशन प्रयोग पाहू शकता. यामध्ये बिकिनी कटमध्ये दोन रंगाची जीन्स शिल्पाने घातलेली दिसत आहे. पुढून शिल्पाची जीन्स निळ्या रंगाची तर मागून अर्धी काळी आहे.

शिल्पाने या जीन्ससह एक काळ्या रंगाचा हॉल्टर नेक बॉडीसुट घातला होता. हलके कर्ल्स, ब्राऊन रंगाचा हलका मेकअप अशा सुंदर स्टाइलसह मनिष मल्होत्रा याच्या पार्टीमध्ये शिल्पाच सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती.

शिल्पाची बिकिनी कट जीन्स

हे ही वाचा<< Video: राणादा लग्नात नाचताना झाला बेभान; जमिनीवर बसला, जोरात हात आपटला अन् तेवढ्यात…

शिल्पाच्या व्हायरल व्हिडिओवर अनेकांनी कमेंट करून तिची तुलना उर्फी जावेदशी केली आहे. काहींनी तर तिला उर्फी जावेदला तुझे कपडे शिवायला देतेस का असा प्रश्नही केला आहे. तुम्हाला शिल्पाची ही दोन रंगांची जीन्स कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 16:55 IST
Next Story
उर्वशी रौतेलाच्या घरी लगीनघाई, अभिनेत्री रंगली हळदीच्या रंगात