Video Urfi Javed Gets Angry Says I Will Cut Private Parts If Somebody Does This Video Goes Viral | Loksatta

Video: तर मी प्रायव्हेट पार्ट कापून.. उर्फी जावेद भडकली; असं काही बोलून गेली की आता..

Urfi Javed Viral Video: उर्फीने आपले काही बेडरूम सिक्रेट्स सोशल मीडियावर उघड केले होते. यातील एका व्हिडिओमध्ये तिने आपल्या जोडीदाराविषयी एक अत्यंत धक्कादायक विधान केलं आहे.

Video: तर मी प्रायव्हेट पार्ट कापून.. उर्फी जावेद भडकली; असं काही बोलून गेली की आता..
Video: तर मी प्रायव्हेट पार्ट कापून.. उर्फी जावेद भडकली; (फोटो: इंस्टाग्राम)

Urfi Javed Bedroom Secrets: सोशल मीडियावर आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत आलेली उर्फी जावेद हे नाव आता सगळ्यांना माहित आहे अगदी रणवीर सिंह पासून ते मसाबा गुप्ता पर्यंत अनेकांनी उर्फी जावेदच्या फॅशनला अत्यंत क्रिएटिव्ह व बोल्ड म्हंटल होतं. तर अलीकडेच चेतन भगत यांनी उर्फीवर टीका केल्याने पुन्हा उर्फी लाइमलाईटमध्ये आली होती. सध्या MTV वरील Splitsvilla या कार्यक्रमात उर्फी आपल्या बोल्ड कपड्यांनी व त्याहूनही अधिक सणसणीत वक्तव्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच उर्फीने आपले काही बेडरूम सिक्रेट्स सोशल मीडियावर उघड केले होते. यातील एका व्हिडिओमध्ये तिने आपल्या जोडीदाराविषयी एक अत्यंत धक्कादायक विधान केलं आहे.

Splitsvilla च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. यामध्ये उर्फीला आपल्या बेडरूममधील आयुष्याबाबत अनेक प्रश्न विचारले होते. उर्फीला असं विचारण्यात आलं की, तुला धोका देणाऱ्या जोडीदारासह राहशील का? हा प्रश्न ऐकताच उर्फी पुरती भडकली होती. यावर उत्तर देताना ती इतकंच म्हणाली की जर मला धोका दिला तर मी त्याचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकेन. हे उत्तर ऐकताच Splitsvilla च्या अन्य सदस्यांच्या भुवयाही उंचावल्या होत्या.

उर्फी जावेद काय बोलून गेली..

हे ही वाचा<< Video: गौतमी पाटीलच्या ‘त्या’ लावणीमुळे पुन्हा झाला राडा; पोलिसांनी गौतमीलाच गाडीत बसवलं अन्..

दरम्यान, उर्फी जावेदने Splitsvilla मध्ये जाताच अनेकांशी पंगे घेतले आहेत. सनी लियोनी व अर्जुन बिजलानी यांचा Splitsvilla शो उर्फीमुळे बराच चर्चेत आहे.सुरुवातीला उर्फी काहीच दिवसांसाठी या कार्यक्रमात जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र आता ती या खेळात चांगलीच रमली आहे. आपल्याला लहानपणापासून प्रेमाची ओढ आहे आणि Splitsvilla हा शो प्रेमाचा आहे त्यामुळे इथे जाण्यासाठी खूप उत्सुक असल्याचे उर्फीने सांगितले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 15:00 IST
Next Story
“सावरकरांच्या सल्ल्यानुसारच….”; शरद पोंक्षेंचे लता मंगेशकर यांच्याबद्दल वक्तव्य