बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री विद्या बालन नेहमीच तिची मतं स्पष्टपणे मांडत असते. तिच्या स्त्रीप्रधान चित्रपटांमुळे तिचा एक वेगळा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने बॉलिवूडबद्दल खंत व्यक्त केली. बॉलिवूडमध्ये स्त्रीप्रधान चित्रपट का बनवले जात नाहीत यावर विद्याने तिच मत मांडल.

बॉलिवूडमधील बहुतांश चित्रपट हे पुरुषप्रधान असतात. आजही नायकच चित्रपटातील मुख्य पात्र आहे असे गृहीत धरले जाते. बॉलिवूडची ही शोकांतिका म्हणावी लागेल. या चौकटीबद्ध विचारसरणीला खोट ठरवत अभिनेत्री विद्या बालनने स्वतःला सिद्ध केले आहे. विद्या बालन अनेक वर्ष स्त्रीप्रधान चित्रपट करत आहे आणि यातून तिने केवळ हिरोच्या नावावर चित्रपट चालतात हा विचार चुकीचा असल्याचे सिद्ध केले आहे.

आणखी वाचा – “आवडत नसेल तर डोळे बंद करा” रणवीरच्या न्यूड फोटोशूटबद्दल …

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विद्या बालनने सांगितले, “काही दिवसांपुर्वी एक व्यक्ती माझ्या हिट चित्रपटांबद्दल माझ्याशी चर्चा करत होती. पण यात त्यांनी ‘मिशन मंगल’चा उल्लेख केला नव्हता. याची मी त्यांना आठवण करून दिल्यावर ते मला म्हणाले, ‘तो तर अक्षय कुमारचा चित्रपट होता.’ म्हणजे हा चित्रपट फक्त अक्षय कुमारचा चित्रपट म्हणून ओळखला जातोय.”

आणखी वाचा – “मी मुलांना जन्म देणारी मशीन नाही…”, प्रेग्नेंसीच्या ‘त्या’ …

विद्या बालन पुढे म्हणाली, “म्हणजे ‘मिशन मंगल’मध्ये माझ्यासह इतर चार अभिनेत्री होत्या हे कोणी पाहिले नाही? हा चित्रपट यशस्वी झाला, याचे श्रेय फक्त अक्षय कुमारला दिले जाते हे फार दुर्दैवी आहे. चित्रपट अक्षय कुमारचा आहे असे म्हटले जाते.कारण इतर अभिनेत्रींना मुख्य पात्र म्हणुन पाहिले जात नाही. बॉलिवूडचे निर्माते स्त्रीप्रधान चित्रपट बनवायला घाबरतात.”