अभिनेत्री विद्या बालन तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. पण यासोबतच ती एक कॉमेडियनही आहे. अभिनयासोबतच तिच्या सेन्स ऑफ ह्यूमरचेही अनेक चाहते आहेत. विद्या सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. ती नेहमी विविध मुद्द्यांवर स्पष्टपणे मत मांडताना दिसते. नुकतंच विद्या बालनने अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर भाष्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्या बालनने नुकतंच एका पुस्तक प्रदर्शन लाँचदरम्यान हजेरी लावली. यावेळी तिला तुला रणवीर सिंगचे न्यूड फोटोशूट आवडते का आणि त्याबद्दल काय वाटते? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने फार स्पष्ट वक्तव्य केले. यावर विद्या म्हणाली, “त्याने तसे फोटोशूट करण्यात काय अडचण आहे? एखाद्या पुरुषाने असं काहीतरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आपण ते पाहूया. यावरुन रणवीरला ट्रोल केलं जाणं फार चुकीचे आहे.”

रणवीरनंतर विजय देवरकोंडाला करायचंय न्यूड फोटोशूट, म्हणाला “मी तयार फक्त…”

“या फोटोशूटमुळे कोणी दुखावले असेल तर त्यांनी ते पाहू नका. त्याबद्दल वाचू नका. पण लोकांनी त्याला काय करावे आणि काय करु नये याचा सल्ला देऊ नये. कारण ते निरर्थक आहे. ते निषेधार्ह आहे. तुम्ही कोणाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करु शकत नाही. आपण सर्व भिन्न माणसे आहोत. जर तुम्हाला ते आवडत नसेल तर डोळे बंद करा”, असेही विद्या बालन म्हणाली.

“जर तुम्हाला एखादे वृत्तपत्र किंवा मासिक आवडत नसेल तर तुम्ही ते फाडून टाका किंवा जाळून टाका. त्याच्या फोटोशूटवरून जे वाद निर्माण होत आहेत, ते आता थांबायला हवे”, असेही विद्या बालनने म्हटले.

दरम्यान रणवीरने शनिवारी २३ जुलै रोजी सोशल मीडियावर एका फोटोशूटचे फोटो शेअर केले. या फोटोतील काही फोटोत रणवीरच्या अंगावर एकही वस्त्र नसल्याचे दिसले. तर काही फोटोंमध्ये रणवीरने केवळ अंर्तवर्स्त्र परिधान केले होते. या नग्नावस्थेतील फोटोंमध्ये तो एका टर्कीश कार्पेटवर पोज देताना दिसला. यात त्याने बोल्ड पोजही दिल्या होत्या. रणवीर सिंगने केलेले हे न्यूड फोटोशूट ‘पेपर’ नावाच्या अमेरिकी मासिकासाठी केले होते. त्याच्या या फोटोवरुन अनेक नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली. तर काहींनी त्याचे समर्थनही केले. यानंतर प्रचंड गदारोळ सुरु झाला.

विश्लेषण : न्यूड फोटोशूटबद्दल शिक्षेची नेमकी तरतूद काय आहे? जाणून घ्या

याप्रकरणी रणवीर सिंगच्या विरोधात दोन ठिकाणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. चेंबूर परिसरातील एका सामाजिक संस्थेने आणि ठाण्यातील एक वकील वेदिका चौबे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. दरम्यान या दोन्ही तक्रारीनंतर पोलिसांनी रणवीर सिंहविरोधात अश्लीलता पसरवल्या प्रकरणी कलमांखाली गुन्ह्याची नोंद केली. रणवीर सिंगविरोधात भादंवि कलम २९२, २९३, ५०९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidya balan defends ranveer singh over nude photo row nrp
First published on: 29-07-2022 at 14:42 IST