विद्या बालन आणि इम्रानची ‘एक अधुरी कहाणी’

बॉलीवूडमधील एक लोकप्रिय जोडी विद्या बालन आणि इम्रान हाश्मी लवकरच त्यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

बॉलीवूडमधील एक लोकप्रिय जोडी विद्या बालन आणि इम्रान हाश्मी लवकरच त्यांच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. ‘हमारी अधुरी कहानी’ या चित्रपटात दोघे एकत्र काम करत आहेत.‘हमारी अधुरी कहानी’ची झलक (फर्स्ट लूक) नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. विद्या बालन आणि इम्रान हाश्मी यांनी या अगोदर ‘द डर्टी पिक्चर’ व ‘घनचक्कर’ या चित्रपटात काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांनाही पसंत पडली होती.‘एक अधुरी कहानी’ चित्रपटात विद्या बालन आणि अभिनेता राजकुमार राव हे पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत. लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या जीवनात इम्रान हाश्मीचा प्रवेश होतो. यामुळे होणारा संघर्ष चित्रपटात दाखविण्यात आला आहे.विद्या बालन हिने २००५ मध्ये ‘परिणीता’ चित्रपटापासून तर इम्रान हाश्मीने २००४ मध्ये ‘फुटपाथ’ चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. इम्रानला ‘मर्डर’ चित्रपटामुळे अधिक प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर दोघांनी चित्रपटातून एकत्र काम केले. आता ‘एक अधुरी कहानी’च्या निमित्ताने दोघेही पुन्हा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vidya balan emraan hashmi in humari adhuri kahani