“किती पुरस्कार खरेदी केले?” विद्या बालनने शाहरुखला भर पुरस्कार सोहळ्यात विचारला होता प्रश्न, व्हिडीओ व्हायरल

विद्या बालन आणि शाहरुख खानचा एका पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

“किती पुरस्कार खरेदी केले?” विद्या बालनने शाहरुखला भर पुरस्कार सोहळ्यात विचारला होता प्रश्न, व्हिडीओ व्हायरल
विद्या बालन आणि शाहरुख खानचा एका पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

शाहरुख खान (Shahrukh Khan), विद्या बालन (Vidya Balan) हे दोन्ही बॉलिवूडमधील टॉपचे कलाकार आहेत. शाहरुखने तर आजवर अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले. त्याचबरोबरीने विद्याने वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मानवर अधिराज्य गाजवलं. शाहरुख आणि विद्याला आजवर त्यांच्या कामासाठी कलाक्षेत्रातील बहुचर्चित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. पण एका पुरस्कार सोहळ्यादरम्यान विद्याने शाहरुखची बोलतीच बंद केली होती. यादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – कुणी तरी येणार गं! बिपाशा बासू होणार आई, फोटो शेअर करत चाहत्यांना दिली गोड बातमी

या व्हिडीओमध्ये शाहरुखसह शाहिद कपूर एका पुरस्कार सोहळ्याचं सुत्रसंचालन करताना दिसत आहेत. विद्याने देखील या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली होती. यादरम्यान शाहरुख-शाहिद विद्याच्या जवळ येतात. शाहिद विद्याला विचारतो, “अजून किती पुरस्कार तू तुझ्या घरी घेऊन जाणार?” या प्रश्नावर विद्या हसते. लगेचच शाहरुख विद्याला प्रश्न विचारतो.

पाहा व्हिडीओ

“तुझ्याजवळ किती पुरस्कार आहेत?” यावर विद्या उत्तर देते की, “एकूण ४७.” विद्या देखील शाहरुखला विचारते, “तुझ्याजवळ किती पुरस्कार आहेत?” “मला किती पुरस्कार मिळाले हे मी मोजत नाही. तरीही १५५ पुरस्कार मला मिळाले आहेत.” असं शाहरुख उत्तर देतो. शाहरुखचं हे उत्तर ऐकून उपस्थितही हसतात.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशामुळे आमिर खान निराश, अभिनेत्याने घेतला मोठा निर्णय

विद्या यावर लगेचच म्हणते, “यामधील किती पुरस्कार तू खरेदी केले आहेस?” विद्याने शाहरुखला हा प्रश्न विचारताच शाहरुखची बोलती बंद होते. “थोडे फार म्हणजे १५०” असं हसत शाहरुख या प्रश्नाचं उत्तर देतो. पुरस्कार सोहळ्याला हजर असणारी मंडळी देखील विद्याच्या या प्रश्नामुळे आश्चर्यचकित होतात. विद्या-शाहरुखचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vidya balan shahrukh khan old video from bollywood award function actress talk about buying awards see details kmd

Next Story
‘RRR’ची ऑस्करवारी : अनुराग कश्यपचं भाकीत खरं ठरणार का?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी