विद्युत जामवाल आणि फॅशन डिझायनर नंदिता मेहताचा ‘कमांडो स्टाईल’ साखरपुडा

विद्युतने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती…

vidyut jammwal, nandita mehtani,
विद्युतने सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली माहिती… (Photo Credit : Vidyut Jammwal Instagram and Indian Express)

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालचा फॅशन डिझायनर नंदिता मेहतानीसोबत साखरपुडा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्या साखरपुड्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र, आता विद्युतने स्वत: सोशल मीडियावर फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

विद्युतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून २ फोटो शेअर केल आहेत. या पैकी एका फोटोत विद्युत आणि नंदिता आर्मी कॅम्पमध्ये १५० मीटरच्या भिंतीवर चढताना दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत ते दोघेही प्रेमाच प्रतिक असलेल्या ताज महाल समोर आहेत. हे फोटो शेअर करत ‘कमांडो पद्धतीने साखरपुडा केला १ सप्टेंबर २०२१’, असे कॅप्शन विद्युतने दिले आहे.

आणखी वाचा : “…म्हणून आज मला भारताची लेक म्हणून घ्यायची लाज वाटतेय’; ‘तारक मेहता…’फेम मुनमुन संतापली

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

आणखी वाचा : मुनमुन दत्तानंतर ‘तारक मेहता..’ फेम राजने सोशल मीडियावरुन रिलेशनशिपबद्दल केलं भाष्य

दरम्यान, अशा चर्चा आहेत की नंदिता आणि विद्युतला ५ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. नंदिता आणि विद्युत बऱ्याचवेळा एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करायचे. मात्र, ते दोघे रिलेशनशिपमध्ये असतील याची कोणालाही कल्पना नव्हती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vidyut jammwal announce his engagement with nandita mehtani officially dcp