बॉलिवूडचा अ‍ॅक्शन सुपरस्टार विद्युत जामवाल आपल्या प्रेमळ आणि उदार स्वभावामुळेही ओळखला जातो. बॉलीवूडच्या बऱ्याच अ‍ॅक्शन चित्रपटातून त्याने भूमिका साकारल्या आहेत. सध्या तो सूत्रसंचालक म्हणून ‘इंडियाज अल्टिमेट वॉरिअर’ या कार्यक्रमाची धुरा सांभाळत आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान त्याने अशी एक गोष्ट केली आहे ज्यामुळे कार्यक्रमासाठी काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे मन त्याने जिंकले आहे.

‘इंडियाज अल्टिमेट वॉरिअर’ हा डिस्कव्हरी प्लस या अ‍ॅपवर दाखवला जाणारा शो भारतातील उत्तोमोत्तम योद्ध्यांचा शोध घेणारा शो आहे. यामध्ये अनेक खडतर आव्हानांचा सामना करून स्पर्धकांना ‘ग्रँड वॉरियर’चा खिताब आपल्या नावे करायचा आहे. या कार्यक्रमासाठी जवळपास १४० जणांचा क्रू काम करत आहे. नुकतीच या शोची शूटिंग पूर्ण झाली आहे. ग्रँड वॉरिअर शोधण्याच्या या कठीण, स्पर्धात्मक पण अविस्मरणीय प्रवासाची सांगता करताना विद्युतने शोच्या क्रूसाठी एक खास गोष्ट केली आहे.

gukesh d creates history becomes youngest Player to win fide candidates title zws
गुकेशला ऐतिहासिक जेतेपद; नामांकितांना मागे सोडत ‘कँडिडेट्स’मध्ये अजिंक्य; जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी पात्र
Gukesh vs Ian Nepo ends in a draw
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा : गुकेश-नेपोम्नियाशी लढत बरोबरीत, संयुक्त आघाडी कायम; विदितने प्रज्ञानंदला रोखले; कारुआना, नाकामुरा विजयी
Vidit Gujarathi defeated Hikaru Nakamura in the Chess Candidates competition sport news
विदितचा नाकामुराला धक्का; गुकेशचा प्रज्ञानंदवर विजय; हम्पीची सलग दुसरी बरोबरी
Video Hardik Pandya Trolled Again For Praying At Gujarat Somnath Temple
Video: शेवटचा पर्याय ‘तोच’! हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सच्या सलग तीन पराभवानंतर पोहोचला गुजरातला अन्..

Photos : प्रियांका चोप्रा ते अनुष्का शर्मा; बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्री आहेत यशस्वी निर्मात्या

विद्युतने या कार्यक्रमासाठी काम करणाऱ्या सर्व १४० क्रू मेंबर्सना स्वतः हस्तलिखित वैयक्तिक नोट्स देऊन संपूर्ण टीमच्या मेहनतीचे कौतुक केले आहे, तसेच सर्वांचे आभार देखील मानले आहेत. विद्युत केवळ स्पर्धकांच्या समर्पणानेच प्रभावित झाला नसून या कार्यक्रमाला न्याय देण्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व क्रू मेंबर्सची मेहनत पाहूनही प्रभावित झाला आहे. विद्युतला त्याच्या औदार्यासाठी संपूर्ण क्रूनेही स्टँडिंग ओव्हेशन दिले.

या कार्यक्रमाप्रती आपल्या भावना व्यक्त करताना विद्युत म्हणाला, ‘केवळ स्पर्धकांमध्येच नाही, तर संपूर्ण निर्मिती युनिटमध्ये एकच आत्मा दिसून आला, जो नेहमीच स्पर्धकांच्या आणि आमच्या मागे खंबीरपणे उभा राहिला. तसेच, स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यासाठी त्यांनी आम्हाला सतत पाठिंबा दिला. मला खात्री आहे की प्रत्येकजण घरी परत जाताना एक बदललेली व्यक्ती म्हणून परत जाईल. मी खरोखर बदललो आहे.’

विद्युत जामवालचा ‘इंडियाज अल्टिमेट वॉरिअर’ हा कार्यक्रम डिस्कव्हरी प्लस या अ‍ॅपवर प्रसारित होत आहे. तसेच, त्याचे टीव्ही प्रक्षेपण सोमवार ते बुधवार रात्री ८ वाजता डिस्कव्हरी चॅनेलवर होते.