scorecardresearch

विजय देवरकोंडालाही करायचंय साराला डेट? म्हणाला “मी तिला मेसेज केला…”

सारा अली खानने करण जोहरच्या चॅट शोमध्ये विजयला डेट करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

विजय देवरकोंडालाही करायचंय साराला डेट? म्हणाला “मी तिला मेसेज केला…”
एका मुलाखतीत विजय देवरकोंडाने साराला डेट करण्याबाबत मौन सोडले आहे.

दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि सारा अली खान यांच्यातील नात्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. मात्र, त्या दोघांमध्ये काय सुरू आहे याबाबत कोणीही उघडपणे बोलायला तयार नाही. दोघंही एकमेकांचं नाव न घेता बरंच काही बोलताना दिसतात. पण आता एका मुलाखतीत विजय देवरकोंडाने साराला डेट करण्याबाबत मौन सोडले आहे.

सारा अली खानने अलिकडेच ‘कॉफी विथ करण सीझन ७’ हजेरी लावली होती. यावेळी करणने तिला, डेट करायला आवडेल अशा मुलाचं नाव विचारलं होतं. करणच्या प्रश्नाचं उत्तर देताना साराने विजय देवरकोंडाचे नाव घेतलं होतं. त्यानंतर जेव्हा विजयला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणाला, “साराचा तो एपिसोड पाहिल्यानंतर मी साराला मेसेज केला आहे. ठीक आहे, मी एक चांगला अभिनेता आहे. मी तिला मेसेज केला होता. ती माझ्याबद्दल जे काही बोलली ते मला आवडल्याचं सांगितलं.”

आणखी वाचा- Koffee with Karan 7 नंतर विजय देवरकोंडा आहे करण जोहरवर नाराज? नेमकं काय आहे सत्य

विजय देवरकोंडाने करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ७’मध्ये हजेरी लावली त्यावेळी करणने त्याला, ‘साराला डेट करायला आवडेल का?’ असा प्रश्न विचारला. त्यावर विजय म्हणाला, “मला रिलेशनशिप हा शब्दही नीट बोलू शकत नाही. तर मग डेटिंगबद्दल मी काय सांगू?”

आणखी वाचा- २ बायका, ४ मुलं अन् गायकाने उर्वशी रौतेलाला केलं लग्नासाठी प्रपोज, अभिनेत्री म्हणते…

दरम्यान सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांनी ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये करणने सारा अली खानला तिला डेट करण्याची इच्छा असलेल्या अभिनेत्याचे नाव विचारले होते. सुरुवातीला साराने करणला उत्तर देण्यास नकार दिला होता. पण नंतर तिने विजय देवराकोंडाचे नाव घेतलं होतं. हे ऐकून जान्हवी कपूर हसू लागली होती. दरम्यान विजय देवरकोंडाचा ‘लायगर’ चित्रपट येत्या २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या