दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा ही विविध कारणांमुळे चर्चेत आहे. पतीला घटस्फोट दिल्यानंतर तिच्या खासगी आयुष्यामुळे या चर्चा सुरु झाल्या होत्या. गेल्या काही महिन्यांपासून समांथा ही ‘पुष्पा’ चित्रपटातील ‘उ अंतावा उ उ अंतावा’ या आयटम साँगमुळे प्रचंड चर्चेत आली होती. दरम्यान लवकरच समांथा ही अभिनेता विजय देवरकोंडासोबत स्क्रीन शेअर करणार आहेत. ते दोघेही लवकरच एका चित्रपटात झळकणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक शिव निर्वाण यांच्या आगामी चित्रपटात समांथा आणि विजय देवरकोंडा एकत्र काम करणारत आहे. आज २१ एप्रिलला या चित्रपटाबद्दलची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. आज हैदराबादमध्येही या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा असेल असे बोललं जात आहे.

prostitution of Mumbai-Delhi girls through dating app Including those working in films advertisements
‘डेटिंग ॲप’च्या माध्यमातून मुंबई-दिल्लीच्या तरुणींचा देहव्यापार; चित्रपट, जाहिरातीत काम करणाऱ्यांचाही समावेश
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
Percival Everett is an American writer American fiction cinema Oscar
बुकबातमी: भटकबहाद्दराची मिसिसिपी मुशाफिरीच, पण भिन्न नजरेतून..

Kajal Aggarwal Son Name: अभिनेत्री काजल अग्रवालने केला बाळाच्या नावाचा खुलासा, म्हणाली…

या चित्रपटाचे शूटींग काश्मीरमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या चित्रपटातील विजय आणि समांथासोबतची काही प्रमुख दृश्ये ही काश्मीरमध्ये शूट केली जाणार आहेत. यानंतर उर्वरित शूटिंग अॅलेप्पी, हैदराबाद आणि विशाखापट्टणम येथे होणार आहे. या चित्रपटात कथा ही लष्कर जवानावर आधारित असल्याचे बोललं जात आहे. यात विजय हा लष्कर जवानाच्या भूमिकेत असणार आहे. येत्या वर्षात या शूटींगला सुरुवात होणार असून पुढील वर्षी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

“ही ट्रॉफी माझ्या एकट्याची नाही तर…”, ‘इंडियन आयडल मराठी’च्या पहिल्या पर्वाच्या विजेत्याची भावूक प्रतिक्रिया

दरम्यान सध्या विजय देवरकोंडा हा त्याच्या आगामी ‘लाइगर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात अनन्या पांडे स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग मुंबईत सुरू आहे. तर समंथा ही सुपरहिट वेब सीरिज ‘फॅमिली मॅन २’ मध्ये मनोज बाजपेयीसोबत खलनायकाच्या भूमिकेत दिसली आहे.