मराठीतील सर्वोत्तम साहित्य आणि मराठी मालिका असा योग क्वचितच जुळून येतो. तसा तो योग आता ‘ई’ टीव्ही मराठीने जुळवून आणला आहे. ज्येष्ठ लेखक विजय तेंडुलकर यांच्या ‘कमला’ या गाजलेल्या नाटकावर आधारित मालिका लवकरच ई टीव्ही मराठीवर दाखल होणार आहे.
नेहमीच्या कौटुंबिक मालिकांपेक्षा वेगळ्या विषयावरच्या मालिकांची संख्या टीव्हीवर तुरळकच आहे. मानवी तस्करीसारख्या गंभीर विषयाला थेट हात घालणारे आणि नव्वदच्या दशकात गाजलेले लेखक विजय तेंडुलकर यांच्या ‘कमला’ या नाटकावर आधारित त्याच नावाची मालिका ‘ई’ टीव्ही वाहिनीवर येत आहे. गावांमधून होणाऱ्या मानवी तस्करीबाबत माहिती गोळा करण्यासाठी दिल्लीतील पत्रकार जयसिंग स्वत: या बाजारातून कमला नामक एका तरुणीला विकत घेतो आणि त्यानंतर तो आणि त्याची बायको सरिता या विळख्यात भावनिकरीत्या कसे गुंतले जातात, यावर हे नाटक बेतले आहे. याबद्दल अधिक माहिती देताना वाहिनीच्या फिक्शन हेड अपर्णा पाडगावकर यांनी सांगितले की, ‘‘‘ई’ टीव्ही मराठीवर दरवेळी काहीतरी वेगळे दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो. मराठी साहित्यातील एखाद्या अजरामर कलाकृतीवरून मालिकेची निर्मिती करण्याचा विचार आमच्या मनात आला. तेव्हा तेंडुलकरांच्या ‘कमला’ या नाटकावर मालिका करायचे असे आम्ही ठरवले.’’ तब्बल वीस वर्ष जुन्या नाटकावर मालिका बनवण्याचा विचार करताना हा विषय आजच्या काळालाही साजेसा असल्याचे अपर्णा सांगतात. ‘तेंडुलकरांनी त्यांच्या नाटकामध्ये मांडलेले मुद्दे आणि विषय यांना काळाचे बंधन नाही. ‘कमला’मध्ये मांडला गेलेला मानवी तस्करीचा विषय आजही तितकाच गंभीर आहे. पण, त्याचबरोबर माणसाचे होणारे व्यापारीकरण हा या नाटकाचा मूळ विषय आहे. आपल्या फायद्यासाठी नाटकाचा नायक कमलाचा एक वस्तू म्हणून वापर करतो. पण, त्याच वेळी नाटकाच्या पुढच्या वळणावर तो आणि त्याची पत्नी सरितासुद्धा या व्यापारीकरणाचा एक भाग होऊन जातात.’

‘तें – एक श्राव्य अनुभव’

arun govil and dipika chikhlia from the Ramayana
‘रामायण’ मालिकेतील राम-सीतेची जोडी ‘या’ मराठी चित्रपटात झळकणार, जाणून घ्या…
subodh bhave Sangeet Manapmaan movie first poster out
Video: सुबोध भावेने ‘संगीत मानापमान’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर केलं शेअर, म्हणाला, “मराठी परंपरेचा साज, मनामनात गुंजणार…”
Zee Natya Gaurav 2024 full list of winners
झी नाट्य गौरव २०२४ : प्रिया-उमेशच्या ‘जर तरची गोष्ट’ नाटकाने मारली बाजी, पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी
Purshottam Berde Reaction on sharad ponkshe and nana patekar trolling
“मी सावरकरांबद्दल बोलू का? असं तो कधीच…”, शरद पोंक्षेंच्या ट्रोलिंगबद्दल पुरुषोत्तम बेर्डेंनी मांडलं मत; नाना पाटेकरांबाबत म्हणाले…

या मालिकेत अक्षर कोठारी आणि दीप्ती केतकर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. कमलाच्या भूमिकेसाठी अश्विनी कसार या नवोदित अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे. नाटकाचे कथानक उत्तर भारतात घडत असले तरी या मालिकेमध्ये मराठी प्रेक्षकाला नजरेसमोर ठेवून त्याचे कथानक इथे घडते असे दाखवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. ‘एका मोठय़ा शहरातील सुशिक्षित, सधन घरातील पत्रकार आणि त्याची पत्नी आणि एका निसर्गाच्या जवळ असलेल्या गावातील असहाय्य तरुणी यांच्या कथेला प्रत्यक्ष पाहायचे झाल्यास कोणतेही भौगोलिक बंधन नाही’, असे अपर्णा यांचे मत आहे.

‘ते’ मराठी नाटक पाहिलं आणि कुणीतरी तोंडात मारल्यानं खुर्चीखाली पडल्यासारखं वाटलं : जावेद अख्तर

शहरी आणि ग्रामीण भागात विखुरलेल्या मराठी प्रेक्षकांमध्ये असा धाडसी विषय कितपत सहजतेने हाताळला जाईल याबद्दल बोलताना त्या सांगतात, ‘सध्याचा प्रेक्षकवर्ग सुजाण होत चालला आहे. तो दरवेळी नवनवीन विषयाची मागणी आमच्याकडून करतो आहे. त्यामुळे हा विषयही प्रेक्षक उचलून धरतील यावर आमचा विश्वास आहे. त्याचबरोबर कोणत्याही कथेतील नवरा-बायकोच्या नात्यातील पदर वरवर पाहता कितीही वेगळे वाटत असले तरी खोलवर गेल्यास त्यांना जोडणारा समान धागा आपल्याला मिळतोच आणि आमच्या प्रेक्षकांनाही हा धागा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यश गिरवण्याचं नाकारणारा लेखक

‘काही वर्षांपूर्वी या नाटकाच्या इंग्रजी आवृत्तीमध्ये विनय आपटे यांनी जयसिंगचे पात्र साकारले होते. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली या मालिकेची निर्मिती करण्याची आमची इच्छा होती. पण, आज ते आपल्यात नाहीत. त्यामुळे ही मालिका म्हणजे आमच्याकडून त्यांना एक मानवंदना असेल,’ असे त्यांनी सांगितले.