Watch These Five Movies Of Vijay & Trisha Krishnan : विजय आणि त्रिशा कृष्णन हे दोघे सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. दोघांच्या डेटिंगपासून ते लग्नापर्यंतच्या चर्चा माध्यमांमध्ये सतत होताना दिसतात. मात्र, या दोघांनीही कधी यावर उघडपणे भाष्य केलेलं नाही. ते नेहमी त्यांच्या नात्याला मैत्रीचं नाव देतात.
वैयक्तिक आयुष्यापेक्षा पडद्यावरची त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना जास्त भावली आहे. विजय आणि त्रिशाने एकत्र ५ चित्रपटांमध्ये काम केलं असून या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरघोस कमाई केली. त्यापैकी एका चित्रपटाने तर कमाईचे अनेक विक्रम मोडले होते. चला तर मग, त्यांच्या सुपरहिट चित्रपटांविषयी जाणून घेऊया…
विजय व त्रिशा यांनी ‘या’ चित्रपटांमध्ये केलंय एकत्र काम
विजय आणि त्रिशा कृष्णन यांची जोडी पहिल्यांदा Ghilli या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळाली होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन धरानी Dharani यांनी केलं होतं आणि हा चित्रपट २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. चित्रपटात प्रकाश राज यांचीही महत्त्वाची भूमिका होती. हा चित्रपटच नाही, तर विजय आणि त्रिशाची केमिस्ट्रीही प्रेक्षकांना खूप आवडली आणि त्यांची जोडी सुपरहिट ठरली.
Ghilli या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली होती. २०२४ मध्ये हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये री-रिलीज करण्यात आला होता आणि त्यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने जगभरात सुमारे ३०.७५ कोटी रुपयांची कमाई केली होती. तर या चित्रपटाचं बजेट जवळपास ८ कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.
विजय आणि त्रिशा कृष्णन यांचा दुसरी हिट सिनेमा म्हणजे ‘थिरुपाची’ Thirupaachi. हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं बजेट सुमारे १४ कोटी रुपये होतं, तर चित्रपटाने जवळपास ३२.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर व्यावसायिकदृष्ट्या हिट ठरला होता.
विजय आणि त्रिशा कृष्णन यांचा तिसरा एकत्रीत चित्रपट होता Aath. हा चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झाला होता. याचं दिग्दर्शन Ramana यांनी केलं होतं. रिपोर्टनुसार, या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नव्हतं आणि त्याने जवळपास २० कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहता येऊ शकतो.
विजय आणि त्रिशा कृष्णन यांचा चौथा चित्रपट ‘कुर्वी’ Kuruvi होता. हा चित्रपट २००८ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि त्याचं दिग्दर्शन धरानी Dharani यांनीच केलं होतं. विजय-त्रिशा या सुपरहिट ऑनस्क्रीन जोडीबरोबर धरानी यांचा हा दुसरा चित्रपट होता. मात्र, यावेळी या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित यश मिळालं नाही. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने जवळपास ३१ कोटी रुपयांचं ग्रॉस कलेक्शन केलं होतं.
विजय आणि त्रिशा कृष्णन यांच्या पाचव्या एकत्रीत काम केलेल्या चित्रपटाचं नाव आहे ‘लिओ’ Leo आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली होती. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटासाठी तब्बल १५ वर्षांनंतर विजय आणि त्रिशाची जोडी पुन्हा एकत्र आली होती आणि प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेम दिलं.
रिपोर्टनुसार, या चित्रपटाचं बजेट सुमारे २५० कोटी रुपये होतं. भारतात या चित्रपटाने जवळपास ३४१.०४ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं, तर जगभरात सुमारे ६०५.९० कोटी रुपयांची कमाई केली होती. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता.
या पाच चित्रपटांव्यतिरिक्त विजयच्या ‘गोट’ या सिनेमामध्ये त्रिशाने कॅमिओ केला होता. २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली होती. त्रिशा ‘Matta’ या गाण्यात डान्स करताना दिसली होती. रिपोर्टनुसार, या चित्रपटाने जगभरात सुमारे ४५७.१२ कोटी रुपयांची कमाई केली, तर भारतात जवळपास २५२.७१ कोटी रुपयांचं नेट कलेक्शन केलं होतं.
