गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटपटू विराट कोहली व त्याच्या चाहत्यांवर टीका करत आहे. विराटने आपल्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचा दावाही राहुलने केला. त्याने विराट व त्याच्या चाहत्यांना ‘जोकर’ म्हटलं होतं. आता विराटचा भाऊ विकास कोहलीने राहुल वैद्यला चांगलंच सुनावलं आहे.

गायक राहुल वैद्य आणि विराट कोहलीच्या चाहत्यांमधील ऑनलाइन वादावर विराटच्या कुटुंबातून प्रतिक्रिया समोर आली आहे. राहुलने विराटला जोकर म्हटलं होतं. विराटने अवनीत कौरच्या फॅनपेजने शेअर केलेली पोस्ट लाईक झाल्याने स्पष्टीकरण दिलं होतं. इन्स्टाग्राम अल्गोरिदममुळे पोस्टवर लाईक दिसत असल्याचं विराटने म्हटलं होतं. याचाच उल्लेख करत राहुलने विराटवर टीका केली. त्याने विराटच्या चाहत्यांना ट्रोल करणाऱ्या काही पोस्ट केल्या होत्या. तसेच काही वर्षांपूर्वी विराटने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं म्हटलं होतं. आता विकास कोहलीने थ्रेडवर राहुलच्या टीकेला उत्तर दिलंय.

विकास कोहलीची पोस्ट

विराट कोहलीचा भाऊ विकास कोहलीने थ्रेडवर लिहिलं, “बाळा इतकी मेहनत जर तू तुझ्या गायनावर घेतली असती, तर मेहनतीने प्रसिद्ध झाला असतास. संपूर्ण देशाचं लक्ष सध्याच्या परिस्थितीकडे लागलंय की काय चाललंय.. हा मूर्ख विराटचे नाव घेऊन फॉलोअर्स मिळवण्याच्या आणि प्रसिद्धी मिळवण्याच्या मिशनवर आहे. लूजर.”

vikas kohli calls idiot o rahul vaidya
विकास कोहलीची थ्रेडवरील पोस्ट

विकास कोहलीने राहुल वैद्यला दिलेल्या उत्तराचा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला आहे. विराटचे चाहते विकास कोहलीची ही पोस्ट शेअर करत आहेत. विकासने राहुल वैद्यला दिलेलं उत्तर अगदी बरोबर असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.

आधी राहुलने विराट व त्याच्या चाहत्यांना इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जोकर म्हटलं होतं. त्यानंतर विराटच्या चाहत्यांनी त्याला ट्रोल केलं. मग राहुल म्हणाला, “तुम्ही मला शिवीगाळ करत आहात, चांगलंय. पण तुम्ही माझी बहीण, माझी पत्नी, ज्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नाही, त्यांनाही शिव्या देत आहेत, हे चुकीचं आहे. म्हणूनच मी म्हणतो की विराट कोहलीचे चाहते जोकर आहेत.”