Vikram Gokhale Films List National Award For Best Actor Anumati Vikram Gokhale Natsamrat Scene Will Bring Tears In Eyes | Loksatta

विक्रम गोखले यांना ‘या’ चित्रपटासाठी मिळाला होता राष्ट्रीय पुरस्कार; Video बघून डोळ्यात येईल पाणी

Vikram Gokhale Films And Awards: विक्रम गोखले यांना आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

Vikram Gokhale Films List National Award For Best Actor Anumati Vikram Gokhale Natsamrat Scene Will Bring Tears In Eyes
विक्रम गोखले यांना आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. (फोटो: युट्युब)

Vikram Gokhale Films And Awards: रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे हरहुन्नरी कलाकार विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम चंद्रकांत गोखले यांनी आज पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. प्रदीर्घ आजारामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात मागील १७ दिवसांपासूनव त्यांनी मृत्यूशी कडवी झुंज दिली पण आज अखेरीस त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गोखले यांचं निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली आहे. यादरम्यान एक खास व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. विक्रम गोखले यांना आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणाऱ्या चित्रपटाचा हा ट्रेलर पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

विक्रम गोखले यांना २०१३ मध्ये अनुमती या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. हा पुरस्कार त्याच वर्षी इरफान खान सह विभागून देण्यात आला होता. अनुमती चित्रपटात विक्रम गोखले यांनी साकारलेली भूमिका मनामनात घर करून गेली होती. एका बापाचं मन मोठ्या पडद्यावर दाखवताना गोखलेंनी प्रेक्षकांच्या मनाच्या हळव्या कोपऱ्याला स्पर्श केला होता.

अनुमती चित्रपटाचा ट्रेलर

विक्रम गोखले यांनी आपल्या कारकिर्दीत तब्बल ५० हुन अधिक चित्रपटात विविधांगी भूमिकांमधून छाप पाडली आहे. मात्र अनुमती मधील गोखलेंची भूमिका आजही विसरता येणे शक्य नाही. या चित्रपटात रीमा लागू, नीना कुलकर्णी आणि सुबोध भावे यांच्यासह विक्रम गोखले यांनी मध्यवर्ती भूमिका साकारली होती. या चित्रपटाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला होता तर. गोखले यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 15:46 IST
Next Story
“खरंच एक चांगला माणूस आणि महान…”; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनावर अजिंक्य देव यांची प्रतिक्रिया