रेखा आणि विनोद मेहरा यांनी गुपचुप लग्न केले होते का?, उत्तर देत मुलगी सोनिया म्हणाली..

जाणून घ्या सविस्तर

दिवंगत अभिनेते विनोद मेहरा यांची मुलगी सोनियाने बॉलिवूड सोडलं अशा चर्चा गेल्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले आहे. नुकताच सोनियाने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली. या मुलाखतीत सोनियाने सध्या सुरु असलेल्या चर्चांवर वक्तव्य केले असून वडीलांच्या आणि अभिनेत्री रेखा यांच्या नात्यावरही वक्तव्य केले आहे.

बॉलिवूड सोडण्यावर सोनिया म्हणाली, “माझा साखरपुडा झाला असून मी बॉलिवूड सोडले नाही.” सोनियाच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव कुणाल आहे. ते दोघे गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. नुकताच त्यांच्या साखरपुड्याला १ वर्ष झाले आहे.

पुठे तिला प्रश्न विचारण्यात आला की, तिच्या वडीलांच्या कोणत्या चित्रपटाच्या रिमेकमध्ये तिला फिमेल लीड करायला आवडेल? सोनिया लगेच म्हणाली ” ‘घर’ आणि ‘द बर्निंग ट्रेन’ या चित्रपटांच्या रीमेकमध्ये मला करायला आवडेल.” घर हा चित्रपट सोनियाची पहिली पसंती म्हणजे १९७८ मधील माणिक चॅटर्जी दिग्दर्शित या चित्रपटातील अभिनेत्री रेखा यांची भूमिका साकारण्याची इच्छा सोनियाने व्यक्त केली.

त्यानंतर सोनियाला एकेकाळी तुझे वडिल आणि रेखा यांनी लग्न केले अशा अफवा परसल्या होत्या. त्यांनी खरच लग्न केले होते का? असा प्रश्न विचारण्यात आला. “मी या प्रश्नावर भाष्य करू शकत नाही कारण मला माहित नाही. माझा जन्म होण्याआधी हे सगळे घडले होते. खरे बोलायच झालं तर यावर बोलण्याचा मला कोणताही अधिकार नाही कारण हे त्यांचे आयुष्य आहे. मला जेवढ माहित आहे त्याप्रमाणे ते खूप चांगले मित्र होते” असे सोनिया म्हणाली.

विनोद मेहरा यांच्या निधनानंतर सोनिया तिच्या आजी-आजोबांकडे केनियाला राहत होती. सोनियाचं शिक्षण केनिया आणि लंडनला झाले आहे. सोनिया वयाच्या ८ वर्षांची असल्यापासून अभिनयाचे धडे घेत होती. दरम्यान लंडन अ‍ॅकॅडमी ऑफ म्युझिक अँड ड्रामाटिक आर्ट्सच्या अभिनयच्या परीक्षेत तिला गोल्ड मेडल मिळालं होतं. १७ वर्षांची असताना ती मुंबईत आली आणि तिने अभिनेता अनुपम खैर यांच्या इंस्टीट्यूटमधून ३ महिन्याचे प्रशिक्षण घेतले. सोनिया अभिनेत्री सोबतच एक ट्रेंड डान्सर आणि योगा इन्स्ट्रक्टर सुद्धा आहे. सोनियाने ‘शॅडो’, ‘एक मैं और एक तू’, आणि ‘रागिनी एमएमएस २’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vinod mehra daughter soniya mehra opens about her fakthers marriage with rekha dcp 98 avb

ताज्या बातम्या