scorecardresearch

“किचन कल्लाकारच्या मंचावर करायचं आम्हाला श्रीखंड…”, विराजसने शिवानीसाठी घेतला हटके उखाणा

यावेळी विराजसने शिवानीसाठी एक छानसा उखाणा घेतला.

छोट्या पडद्यावरील ‘माझा होशील ना’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून विराजस कुलकर्णी ओळखले जाते. विराजस कुलकर्णी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. विराजस लवकरच अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत लगीनगाठ बांधणार आहे. नुकतंच विराजस आणि शिवानी यांनी झी मराठीवरील किचन कल्लाकारच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी विराजसने शिवानीसाठी एक छानसा उखाणा घेतला.

विराजसने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो किचन कल्लाकारच्या मंचावर एक छानसा उखाणा घेताना दिसत आहे. त्यासोबत या कार्यक्रमात अभिनेत्री रेणुका शहाणेही सहभागी झाल्याचे दिसत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा विराजसला उखाणा घेण्यास सांगतो. त्यावर विराजस छान उखाणा घेतो.

“माणसं वेगवेगळ्या प्रकारची असतात पण…”, कुशल बद्रिकेने शेअर केला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा ‘खास’ फोटो

“किचन कल्लाकारच्या मंचावर करायचा आम्हाला श्रीखंड, शिवानी बरोबर आहेच, पण मिळेल का मला हे भांडं…!!”, असा उखाणा विराजसने यावेळी घेतला. त्याचा हा उखाणा ऐकल्यावर शिवानीने एक मिनिट माझ्या पोटात गोळा आला अशी प्रतिक्रिया दिली. यानंतर रेणुका शहाणे या देखील छान उखाणा घेताना दिसत आहेत. “राणाजींना अजिबात आवडत नाही कावळ्याची काव काव, किचन कल्लाकारवर येऊन मला हवाय हा डाव”, असा उखाणा त्या घेतात.

हा संपूर्ण व्हिडीओ शेअर करताना विराजसने त्या पोस्टला छान कॅप्शन दिले आहे. “कुणाचा उखाणा ज्यास्त आवडला? बघा आम्हाला झी मराठी वर किचन कल्लाकार च्या ह्या बुधवारच्या खास भागामध्ये!!”, असे त्याने म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्रींचा बहुचर्चित ‘द कश्मीर फाइल्स’ लवकरच ओटीटीद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

दरम्यान विराजस आणि शिवानी हे येत्या ७ मे रोजी पुण्यामध्ये विवाहबद्ध होणार आहेत. सध्या या दोघांच्या घरी लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. त्यांच्या लग्नाची पत्रिकाही काही दिवसांपासून व्हायरल होत होती. सध्या ते दोघेही विविध मित्रमैत्रिणींच्या घरी केळवण एन्जॉय करताना दिसत आहे. विराजस कुलकर्णीने माझा होशील ना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. विराजस हा अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. विराजस हा खूप चांगला लेखक आणि दिग्दर्शक असून त्याने ‘हॉस्टेल डेज’ या चित्रपटात काम केले आहे. तर शिवानीने अनेक मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम केलं आहे. शिवानी शेवटी ‘सांग तू आहेस ना’ या मालिकेत दिसली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virajas kulkarni and shivani rangole visit kitchen kallakar said ukhana for future wife nrp