कलाकारांच्या लहान-सहान कृतींवर प्रेक्षकांचं आणि प्रामुख्याने ट्रोलर्स लक्ष ठेवून असतात. बऱ्याचदा अनेक कलाकार सोशल मीडियावर ट्रोल होतात. काहींना तर भर कार्यक्रमात प्रेक्षकही ट्रोल करतात. असाच एका गायिकेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या गायिकेला कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकांनी दाद न दिल्याने तिला गाणं थांबवावं लागलं. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला नेटकरी गायन सोडण्याचाही सल्ला देऊ लागले आहेत.

हेही वाचा – ‘हिला दगड मारा’ म्हणणाऱ्या ट्रोलर्सना उर्फीचं हटके उत्तर; दगडांपासून बनवला ड्रेस

पाकिस्तानी टीव्ही अभिनेत्री हिरा मानी ‘प्रीत ना करिओ कोई’, ‘दो बोल’ आणि ‘कशफ’ सारख्या शोसाठी ओळखली जाते. मालिका आणि शोमध्ये काम करण्यासोबतच हिरा गाणेही गाते. पण अलीकडेच तिच्या एका कॉन्सर्टमध्ये घडलेली एक गोष्ट तिच्यासाठी खूपच लाजिरवाणी होती. या कॉन्सर्टमध्ये तिच्या गाण्यावर ज्या पद्धतीने लोकांच्या प्रतिक्रिया आल्या, ते तिच्यासाठी खूपच धक्कादायक होतं.

हेही वाचा – सुपरफ्लॉप ठरलेल्या ‘शमशेरा’मागील ग्रहण संपेना; कोर्टाने निर्मात्यांना एक कोटी जमा करण्याचे दिले आदेश

हिराचं ‘सवारी’ हे गाणं काही दिवसांपूर्वी चांगलंच व्हायरल झालं होतं. या व्हायरल हिटनंतर ती तिच्या अभिनयापेक्षा गाण्याकडे जास्त लक्ष देत आहे. अशातच १४ ऑगस्ट रोजी हिरा लंडनमध्ये ‘जश्न-ए-आझादी’च्या निमित्ताने एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत होती. पण तिचे प्रेक्षक तिला ऐकत होते की नाही, याबद्दल जरा शंका आहे. कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद फारच कमी होता. प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद पाहून हिराने गाणे गात त्यांना त्यात सामावून घेण्याचा एक प्रयत्न केला. तिने ‘जा तुझे माफ किया’ हे गीत गायलं आणि प्रेक्षकांना त्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. तिने स्टेजवरून गाण्याची एक ओळ गायल्यानंतर ‘तुम्हीही माझ्यासोबत गा’ असं म्हटलं पण घडलं उलटंच. प्रेक्षक गाणं म्हणण्याऐवजी गप्प बसले.

हेही वाचा – चित्रपट फ्लॉप झाल्यावर जबाबदारी कोणाची? अक्षय कुमार म्हणाला, “मी मुख्य भूमिका…”

हिराने सलग दोन-तीन वेळा स्टेजवरूनच गाणं गात प्रेक्षकांना त्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रेक्षक गप्पच बसले. तुम्ही जर माझ्यासोबत गाणं म्हटलं नाही, तर मी गाणार नाही, असंही ती म्हणाली. कहर म्हणजे असं म्हटल्यावरही प्रेक्षक गप्पच बसले.

पाहा व्हिडीओ –

कॉन्सर्टमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आता लोक सोशल मीडियावर तिला ट्रोल करून गायन थांबवण्याचा सल्लाही देत आहेत.