बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. आता राखीचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेला गेल्याचे कळताच ती त्यांना अमेरिकेहू काही वस्तू आणण्यासाठी सांगते. तिचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे.

नेहमी प्रमाणे राखी फोटोग्राफरशी संवाद साधत असते. दरम्यान एका फोटोग्राफरने तिला सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला गेले आहेत. त्यावेळी एका फोटोग्राफरने राखीला प्रश्न विचारला की मोदीजी अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. अशावेळी तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश द्याल? फोटोग्राफरच्या या प्रश्नावर राखीने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

What Mahua Moitra Said?
“S*X…” तुम्हाला उर्जा कुठून मिळते? महुआ मोइत्रांच्या कथित उत्तराचा व्हिडीओ व्हायरल
miller mathew
“दहशतवाद्यांना घरात घुसून मारू”, मोदींच्या वक्तव्यावर अमेरिकेची प्रतिक्रिया; म्हणाले, “भारत-पाक वादात आम्हाला…”
Bhayander
भाईंदर : माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सांच्या भूमिकेकडे लक्ष, महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच
America on arvind kejriwal arrest
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरील कारवाईची जर्मनीनंतर अमेरिकेकडूनही दखल

फोटोग्राफरने विचारलेला प्रश्न ऐकून राखी दोन मिनिटे विचार करते आणि म्हणते, ‘नमस्कार मोदीजी, तुम्ही अमेरिकेला गेलात हे ऐकून मला आनंद झाला. तेथील सगळ्या भारतीयांना माझ्याकडून प्रेम आणि माझा संदेश त्यांना द्या. त्यांना सांगा की माझे त्यांच्यावर खूप प्रेम आहे. भारतात परत येण्यापूर्वी माझ्यासाठी अमेरिकेहून काही तरी घेऊन या. काही वस्तू खरेदी केल्या नाहीत तर डॉलर घेऊन या.’

राखीचा हा मजेशीर व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून चर्चेत आहे.