विराट-अनुष्कासोबत टीम इंडियाने पाहिला ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’

या प्रिमिअरसाठी सचिनच्या टीमने खास तयारी केली होती

सचिन तेंडुलकरच्या आत्मचरित्रपट ‘सचिनः अ बिलिअन ड्रिम्स’ या सिनेमाचा प्रिमिअर शो आज पार पडला. या सिनेमाच्या प्रिमिअरवेळी सचिनने संपूर्ण टीम इंडियाला आमंत्रण दिले होते. सर्वसाधारणपणे सिनेमाचा प्रिमिअर शो म्हटला की तो रात्रीच असतो. पण सचिनने मात्र ही पद्धत मोडून काढत आज दुपारीच सिनेमाचा प्रिमिअर ठेवला होता. यावेळी सगळ्यांच्या नजरा या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यावर खिळल्या होत्या. तर दुसरीकडे शिखर धवन प्रिमिअरला आपल्या मुलाला घेऊन आला होता.

https://www.instagram.com/p/BUejsTnDGAj/

विराट, अनुष्काने सचिन आणि त्याची पत्नी अंजली यांच्यासोबत काही फोटोही काढले. हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. काल रात्री विराट आणि अनुष्का, झहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या साखरपुड्याला एकत्र दिसले होते. यावेळचेही दोघांचे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. युवराज सिंगनेही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या प्रिमिअरचा फोटो शेअर करत सचिनला या सिनेमासाठी शुभेच्छा दिल्या.

https://www.instagram.com/p/BUeXJv3DmJr/

https://www.instagram.com/p/BUelL9bDwg3/

या प्रिमिअरसाठी सचिनच्या टीमने खास तयारी केली होती. रेड कार्पेटला पूर्ण बदलून क्रिकेट बॉलचा आकार दिला होता. तर भिंतींवर सचिनच्या आयुष्याशी निगडीत महत्त्वाचे फोटो चिकटवले होते. सचिनच्या या सिनेमाचं दिग्दर्शन जेम्स अर्स्किन यांनी केलं आहे. या सिनेमात सचिनसह त्याची पत्नी, मुलगी, वीरेंद्र सेहवाग आणि महेंद्र सिंह धोनीही दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/BUedIZUjmiq/

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Virat kohli anushka sharma attend premiere of sachin a billion dreams see pics