विराटने ट्विटरच्या माध्यमातून हा फोटो शेअर केला असून या तो अनोख्या रुपात दिसून येत आहे. मात्र हे पोस्टर कोणत्याही चित्रपटाचं किंवा माहितीपटाचं नसून एका अॅड फिल्मचं आहे. या अॅड फिल्मने त्यांचं पोस्टर नुकतचं लॉन्च केलं असून यात विराटची एण्ट्री एखाद्या अॅक्शनपॅक्ड चित्रपटासारखी दिसून येत आहे.
View this post on Instagram
Another debut after 10 years, can’t wait! #TrailerTheMovie www.trailerthemovie.com
‘ट्रेलर’ असं त्याच्या आगामी अॅड फिल्मचं नाव असून विराटच्या टी-शर्टवरही या प्रोडक्शन हाऊसचा लोगो दिसून येत आहे. या फोटोमध्ये विराट एका नव्या अंदाजात दिसत असून यापूर्वी रणवीर सिंह आणि रोहीत शेट्टी यांच्याही अॅड मुव्हीसाठीचं पोस्टर प्रदर्शित झालं होतं. पण त्यांच्यापेक्षा विराटची चर्चा चांगलीच रंगल्याचं दिसून येत आहे.