“तिच्या सारखी जोडीदार मिळणं हे माझं भाग्य”; अनुष्का शर्माचं कौतुक करत विराट म्हणाला…

या मुलाखतीत विराटने अनुष्कामुळे त्याचं आयुष्य बदलल्याचं म्हटंल आहे.

anushka-shrama-virat-kohli1200
(File Photo)

सेलिब्रिटी कपलपैकी लोकप्रिय जोडी म्हणजे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा. विराट कोहली कायमच अनुष्का शर्माचं कौतुक करताना दिसतोय. इंग्लड टेस्टपूर्वी दिनेश कार्तिकने विराट कोहलीची मुलाखत घेतली असून या मुलाखतीत विराटने अनुष्काचं त्याच्या आयुष्यात महत्वाचं स्थान असल्याचं म्हंटल आहे.

या मुलाखतीत दिनेशने विराटला अनुष्का आणि त्याच्या पहिल्या मुलाखती बद्दल विचारलं. एका शॅम्पूच्या जाहिराती निमित्ताने विराट अनुष्काची भेट झाली होती. या मुलाखतीत विराटच्या जोकवर अनुष्काची कशी प्रतिक्रिया होती हे देखील दिनेशने विचारलं. या मुलाखतीत विराटने अनुष्कामुळे त्याचं आयुष्य बदलल्याचं म्हटंल आहे. एक व्यक्ती म्हणून जडणघडणीत अनुष्काचा मोठा हातभार असल्याचं विराट म्हणाला.

हे देखील वाचा: “कपडे बदलत असताना ते माझ्या खोलीत आले आणि माझ्या…”; हनी सिंगच्या पत्नीचे सासऱ्यांवर खळबळजनक आरोप

या मुलाखतीत विराट म्हणाला, “मी कुठे आहे आणि मी काय करतो, याचा माझ्यावर काय परिणाम होवू शकतो हे तिनेच मला जाणवून दिलं आणि हे मी प्रत्येकाला सांगतो. तिने माझ्यात खूप मोठे बदल घडवून आणले आहेत. मला वाटतं हे क्रिकेटमध्येही दिसून येतं. मी आज जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय अनुष्काला जातं. ती माझी जोडीदार आहे यापेक्षा मोठं भाग्य नाही.”

हे देखील वाचा: Birthday Special: “तो अजिबात रोमॅण्टिक नाही पण…”; काजोल अजय देवगणची लव्ह स्टोरी

सध्या विराट कोहली अनुष्का शर्मा आणि आपली ६ महिन्यांची मुलगी वामिकासोब इंग्लंड दौऱ्यावर आहे. इंग्लंडमध्ये मजा करतानाचे अनेक फोटो अनुष्का तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. नुकतेच अनुष्काने वामिकाला ६ महिने पूर्ण झाल्यानिमित्ताने खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Virat kohli praises wife anushka sharma said anushka elevated him as a person kpw