सागरिकाने युवराजसोबत शेअर केलेल्या फोटोवर हेजलची अतरंगी प्रतिक्रिया

काहींनी ती सागरिकाचा द्वेष करते असेही म्हटले

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी मंगळवारी मुंबईत रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींपासून क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. लोअर परेल येथील सेंट रेगिस या पंचतारांकित हॉटेलमध्ये राजेशाही रिसेप्शन देण्यात आले होते. या रिसेप्शचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यातला क्रिकेटर युवराज सिंगच्या व्हायरल झालेल्या फोटोची चर्चा सर्वात जास्त आहे.

रिसेप्शनसाठी युवराजने मरुन रंगाचा कुर्ता घातला होता. तर सागरिकानेही त्याच रंगाचा ड्रेस घातला होता. दोघांनी विरुष्काच्या लग्नात एकत्र फोटो काढला. हा फोटो झहिर खाननेच काढला. सागरिकाने हा फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, ‘मिस्टर सिंगसोबत चांगला ताळमेळ आहे. हेजल कीच तुझी आठवण येतेय.’ सागरिकाच्या या फोटोवर हेजलनेही त्याच तोडीचे उत्तर देत म्हटले की, ‘मला वाटतं की माझ्यात आणि झहीरमध्ये चांगला ताळमेळ होण्यासाठी दोघांनी सारख्या रंगाचे कपडे घालायला हवेत.’ हेजलच्या या कमेंटवर लोकांनी तिची थट्टा उडवण्यास सुरूवात केली. काहींनी ती सागरिकाचा द्वेष करते असेही म्हटले. काही कारणांमुळे हेजल या पार्टीला उपस्थित राहू शकली नव्हती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Virushka wedding sagarika ghatge shares a photo with yuvraj singh and wife hazel keech gives a witty reply

ताज्या बातम्या