The Kashimr Files साठी अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रींनी किती घेतलं मानधन? वाचा सविस्तर | vivek agnihotri and anupam kher fees for film the kashmir files know the details | Loksatta

The Kashimr Files साठी अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रींनी किती घेतलं मानधन? वाचा सविस्तर

बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’मधील कलाकारांच्या मानधनाचे आकडे समोर आले आहेत.

The Kashimr Files साठी अनुपम खेर आणि विवेक अग्निहोत्रींनी किती घेतलं मानधन? वाचा सविस्तर
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेता अनुपम खेर यांनी किती मानधन घेतलं हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणाऱ्या विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटानं अनेक चित्रपटाचे विक्रम मोडीत काढले आहेत. अगदीच कमी बजेटमध्ये तयार करण्यात आलेला हा चित्रपट एवढी मोठी कमाई करेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरलेल्या या चित्रपटाच्या कमाईची तर सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. पण यासोबतच चर्चा आहे ती चित्रपटातील कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटासाठी घेतलेल्या मानधनाची. विशेषतः दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि अभिनेता अनुपम खेर यांनी या चित्रपटासाठी किती मानधन घेतलं हे जाणून घेण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.

विवेक अग्निहोत्रींचं दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अभिनेता दर्शन कुमार, पल्लवी जोशी, अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती यांच्या मुख्य भूमिका आहे. या सर्वांच्याच भूमिकांचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. या चित्रपटासाठी विवेक अग्नितहोत्री यांची पत्नी पल्लवी जोशी या चित्रपटात राधिका मेनन ही भूमिका साकारली आहे. त्यांनी ५० ते ७० लाख रुपये एवढं मानधन घेतलं आहे. याशिवाय कृष्णा पंडित या मुलाची भूमिका साकरणाऱ्या अभिनेता दर्शन कुमार यानं या चित्रपटासाठी ४५ लाख रुपये एवढं मानधन घेतल्याचं बोललं जात आहे.

आणखी वाचा- ‘द कश्मीर फाइल्स’च्या कमाईची रक्कम दान का करत नाहीस? IAS अधिकाऱ्याच्या प्रश्नाला विवेक अग्निहोत्रींचं उत्तर

विवेक अग्निहोत्री यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट जेवढा सोशल मीडियावर गाजतोय तेवढंच दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचं कौतुक होताना दिसतंय. विवेक अग्निहोत्री यांच्या दिग्दर्शनानं सर्वांची मनं जिंकली आहेत. या चित्रपटासाठी विवेक अग्निहोत्री यांनी तब्बल १ कोटी रुपये एवढं मानधन घेतलं आहे. अभिनेता अनुपम खेर यांनी या चित्रपटात पुष्कर नाथ ही दमदार भूमिका साकारली आहे. या भूमिकेसाठी अनुपम खेर यांना १ कोटी रुपये एवढं मानधन देण्यात आल्याची माहीती मिळत आहे.

आणखी वाचा- “अमिताभ बच्चन यांनी नकार दिला असता तर…”, ‘रनवे 34’बाबत अजय देवगणचा मोठा खुलासा

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी या चित्रपटात दमदार अभिनय केला आहे. त्यांनी या चित्रपटात IAS ब्रह्म दत्त यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी मिथुन चक्रवर्ती यांनी १.५ कोटी एवढं मानधन घेतलं आहे. मिथुन चक्रवर्ती हे या चित्रपटात सर्वाधिक मानधन घेणारे एकमेव अभिनेता आहेत. याशिवाय लक्ष्मी दत्त ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटासाठी ५० लाख रुपये एवढं मानधन घेतलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“प्रत्येकाला वाटतं की आयुष्यात एकदा तरी…”, हेमांगी कवीने व्यक्त केली ‘ती’ इच्छा

संबंधित बातम्या

‘आरआरआर’, ‘केजीएफ’ नव्हे तर ‘या’ चित्रपटाला लोकांनी सर्वाधिक सर्च केलंय; गुगलने दिली माहिती
“दीपाली सय्यद यांनी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून बोगस लग्न लावली”, माजी स्वीय्य सहाय्यकाचे गंभीर आरोप; राज्यपालांवर
‘पसूरी’, ‘श्रीवल्ली’ की ‘चांद बालियां’? पाहा कोणतं आहे २०२२ मधील सर्वात लोकप्रिय गाणं
‘कधी तिच्यासोबत मंदिरातही जा..’ अजमेर शरीफला गेल्यानं शोएब- दीपिका ट्रोल
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द
सुशोभीकरणाच्या १८७ कामांचा आज प्रारंभ; शिंदे गट – भाजपची मुंबई महापालिका निवडणूक तयारी सुरू
‘धारावी प्रकल्पाचे काम केवळ पाच हजार कोटींना कसे दिले?’; गैरव्यवहार असल्याचा पटोले यांचा आरोप