आमिर खानचा बहुचर्चित ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट मागच्या महिन्यात प्रदर्शित झाला. हा चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’ या हॉलिवूड चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटामध्ये आमिरसह करीना कपूर, मोना सिंग, नागा चैतन्य आणि मानव विज यांनी काम केले आहे. ‘फॉरेस्ट गंप’चा हिंदी रिमेक तयार करण्याचा विचार अभिनेता अतुल कुलकर्णी यांच्या मनात आला. एका कार्यक्रमानिमित्त अतुल आणि आमिर भेटले होते. तेव्हा त्यांनी ही गोष्ट आमिरला सांगितली. पण त्यावेळी आमिरने त्यावर काहीच उत्तर दिले नाही. काही काळानंतर आमिरने खूप विचार करुन ‘लाल सिंग चड्ढा’ बनवायचे ठरवले.

करोनामुळे लाल सिंग चड्ढा हा चित्रपट लांबणीवर पडला. त्यानंतर ऑगस्ट २०२२ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये त्रृटी असल्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरवली. त्यात बॉयकॉटच्या ट्रेंडचा फटका चित्रपटाला बसला. आमिर खानने भूतकाळात केलेल्या वक्तव्यांमुळे त्याचे चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणी सोशल मीडियावर व्हायला लागली. १८० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करुन तयार केलेला हा चित्रपट १०० कोटी रुपयेही कमावू शकला नाही. चित्रपटाचे अपयश पाहून आमिर घेतलेले मानधनाचे पैसे परत केले.
आणखी वाचा- “ही शिक्षित, हुशार माणसं देशाच्या मातीशी..” विवेक अग्निहोत्रींनी केले जावेद अख्तर यांचं कौतुक

‘द कश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक ‘विवेक अग्निहोत्री’ यांनी देखील लाल सिंग चड्ढा का फ्लॉप झाला यावर भाष्य केले. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी चित्रपट न चालल्याचे खापर आमिर खान फोडले आहे. बॉयकॉट ट्रेंडविषयी विवेक म्हणाले, “चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येकजण मोदी भक्तांमुळे ‘लाल सिंग चड्ढा’ फ्लॉप झाला असा विचार करत आहे. पंतप्रधान मोदींना देशातल्या ४०-५०% लोकांची मते मिळाली आहेत. मग उरलेली ५०% जनता हा चित्रपट पाहायला का गेली नाही ? बॉलिवूडमध्ये जरी बॉयकॉटचा ट्रेंड असला, तरी त्यांचे खरे चाहते चित्रपट पाहायला का आले नाहीत? याचाच अर्थ आमिरचा चाहतावर्ग खोटा असून तुम्ही लोकांना फसवत आहात.”

आणखी वाचा- तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्यांदाच राज कुंद्रा सोशल मीडियावर सक्रिय, ट्वीट करत म्हणाला…

पुढे आमिर खानवर टीका करताना विवेक यांनी, “जर तुमच्याकडे खरा चाहतावर्ग अस्तित्वात नसेल, तर तुमचे चित्रपट कोण पाहणार ? मग अशा वेळी १५०-२०० कोटी खर्च करुन बिगबजेट चित्रपट तयार करणे निरर्थक आहे. ‘दंगल’ चित्रपटाच्या वेळी सुद्धा त्याला विरोध झाला होता. पण तो सुपरहिट झाला. कारण लोकांना आमिरची मेहनत दिसली. या चित्रपटामध्ये वडिलांची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी वजन वाढवले होते. त्यावेळी प्रेक्षक चित्रपटाशी जोडले गेले होते. आता मात्र तसं काही घडलं नाहीठ” असे विधान केले.