दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाची सध्या देशभरात चर्चा आहे. चित्रपटाची कमाई दिवसेंदिवस वाढत आहे. सिनेमागृहांमध्ये लोकांची गर्दी होत आहे. या सगळ्यामध्ये हरियाणातील रेवाडी येथील काही नेत्यांनी लोकांना हा चित्रपट मोफत दाखवण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी एक पोस्टरही शेअर केले आहे. विवेक अग्निहोत्री यांनी हे पोस्टर्स पाहिल्यानंतर आक्षेप घेतला आहे. अग्निहोत्री यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे याबाबत तक्रार केली आहे.

‘द कश्मीर फाइल्स’ दररोज चांगली कमाई करत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी दररोज चित्रपटगृहात पोहोचत आहे. त्याचवेळी, या सगळ्यात काही राजकारणी स्वखर्चाने किंवा फुकटात ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट आपल्या लोकांना दाखवत आहेत. अशा स्थितीत हा चित्रपट प्रेक्षकांना फुकटात दाखवल्याबद्दल विवेक अग्निहोत्री यांनी संताप व्यक्त केला आहे.

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
chagan bhujbal
महायुतीच्या बैठकीत नाशिकचा तिढा सुटेल; छगन भुजबळ यांना विश्वास
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
Benjamin Basumatary sleeping on cash
नोटांच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या नेत्याचा फोटो व्हायरल; भाजपाच्या मित्रपक्षाने म्हटले…

“काश्मीरची खरी फाईल काय आहे हे…”; The Kashmir Files चित्रपटावर संजय राऊतांची प्रतिक्रिया

हरियाणातील रेवाडी येथील भाजपा अध्यक्ष केशव चौधरी यांनी आपल्या जिल्ह्यात ‘द कश्मीर फाइल्स’ मोफत दाखवण्याची घोषणा केली आहे. यासाठी केशव चौधरी यांनी एक बॅनरही तयार केला आहे, ज्यामध्ये रविवार, २० मार्च रोजी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट २० X १० एलईडी स्क्रीनवर मोफत दाखवण्याची घोषणा करण्यात आली आहे. केशव चौधरीचे हे बॅनर छायाचित्र विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे.

या बॅनरचा फोटो शेअर करत विवेक अग्निहोत्री यांनी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे तक्रार केली आहे. आणि असे चित्रपट फुकटात दाखवू नयेत अशी विनंती केली. आपल्या ट्विटमध्ये मनोहर लाल खट्टरला टॅग करत विवेक अग्निहोत्री यांनी, “द कश्मीर फाइल्स अशा प्रकारे उघडे आणि फ्री दाखवणे गुन्हा आहे. मनोहर लाल खट्टर जी, मी तुम्हाला हे थांबवण्याची विनंती करतो. राजकीय नेत्यांनी सर्जनशील व्यवसायाचा आदर केला पाहिजे आणि खरा राष्ट्रवाद आणि समाजसेवा म्हणजे कायदेशीर आणि शांततेने तिकीट खरेदी करणे,” असे म्हटले आहे.

विवेक अग्निहोत्रीचे हे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या ट्विटवर दिग्दर्शकाचे चाहते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. ‘द कश्मीर फाइल्स’चा बॉक्स ऑफिसवर दबदबा कायम आहे. या चित्रपटाने रिलीजच्या आठ दिवसांत ११८ कोटींहून अधिक कमाई केली आहे. नवव्या दिवशी म्हणजेच शनिवारी स्वतःच्या कमाईचा विक्रम मोडत या विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाने २३ कोटींहून अधिक कमाई केली आहे.

“आता चित्रपटाच्या दिग्दर्शकाला पद्मश्री किंवा पद्मभूषण…”; ‘द कश्मीर फाइल्स’वरुन राऊतांचा भाजपावर निशाणा

रविवारी हा चित्रपट १५० कोटींचा टप्पा पार करेल यात शंका नाही. अक्षय कुमारचा बच्चन पांडेही त्याच्या मार्गात अडथळा ठरू शकला नाही. शनिवारी दुसऱ्या वीकेंडमध्ये, द काश्मीर फाइल्सने जबरदस्त उडी घेतली. एका दिवसात आतापर्यंतचे सर्वात मोठे कलेक्शन करत या चित्रपटाने २३ कोटी ते २५ कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा प्रकारे त्याची एकूण कमाई १४३ कोटींच्या आसपास पोहोचली आहे. २५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट, ज्यामध्ये एकही सुपरस्टार नाही, एवढा मोठा व्यवसाय करेल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती.