बॉलिवूड चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने फ्लॉप होत आहेत. निर्माते सोशल मीडियावरील बॉयकॉट ट्रेंड चित्रपटाच्या अपयशाचे खापर फोडताना दिसत आहेत. तसेच लोकांनी चित्रपटांवर बहिष्कार टाकू नये असे आवाहन केले जात आहे. चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, स्टार कलाकार, बॉयकॉट ट्रेंडमुळे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगले चालत नाहीत आणि यामुळे कॅमेरामन, मेकअप कलाकार यांसारख्या क्रू मेंबर्सच्या कमाईवर परिणाम होत आहे असं म्हणताना दिसत आहेत. बॉलिवूड कलाकरांच्या या खोटेपणावरचा पडदा उठवत विवेक अग्निहोत्रीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक ट्वीट केले आहे.

अलिकडेच एका नेटकऱ्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर केली होती. यात त्याने लिहिलं, “मी बॉलीवूडच्या कोणत्याही बॉयकॉट ट्रेंडचं समर्थन करत नाही. कॅमेरामन, तंत्रज्ञ, कलाकार, नृत्यदिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट म्हणून लाखो भारतीयांना उद्योगात रोजगार मिळतो आणि जेव्हा आम्ही उद्योगाला लक्ष्य करतो तेव्हा त्यांच्या उपजीविकेवरही परिणाम होतो. त्यामुळे बॉयकॉट ट्रेंड हा पूर्णपणे वेडेपणा आहे.”
आणखी वाचा-“मी काही तज्ञ नाही पण…” बॉलिवूड चित्रपटांच्या अपयशावर स्पष्टच बोलल्या पल्लवी जोशी

युजरने पुढे लिहिले, “अचानक सोशल मीडियावर प्रत्येकाने इंडस्ट्रीला आणि आमच्यापेक्षा वेगळे मत असलेल्या लोकांना टार्गेट करायला सुरुवात केली आहे. असेच करत राहिलो तर लोनी लेफ्ट आणि आपल्यात काय फरक राहील. आपण आता सर्वशक्तिमान देव होण्याचा प्रयत्न करणं थांबवायला हवं.”

आणखी वाचा-‘लायगर’मुळे विजय देवरकोंडाला मोठा फटका, ‘या’ चित्रपटाचं शूटिंग झालं कायमस्वरूपी बंद

यावर उत्तर देताना विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं, ‘तुम्ही इथेच चूक करत आहात. चित्रपटाच्या अपयशाचा परिणाम फक्त कलाकार आणि निर्मात्यांना होतो. कॅमेरामन, मेकअप आर्टिस्ट यांसारख्या क्रू मेंबर्सना याचा फटका बसतो हे साफ खोटं आहे. त्यांना पगार मिळतो. त्यांना चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कामगिरीने फरक पडत नाही. हे तर, ‘गांधी घराणं हरलं तर शेतकरी आणि कामगार वर्गही हरेल.’ असं म्हटल्यासारखं आहे.