शाहरुख खानने हनी सिंगच्या लगावली होती कानशिलात?; पत्नी शालिनीनं सांगितलं केला होता खुलासा

हनी सिंगची पत्नी शालिनीने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता.

Honey Singh, Shahrukh Khan, Shalini Talwar,

बॉलिवूडमधील प्रसिद्ध रॅपर हनी सिंग एका वेगळ्याच प्रकरणामुळे सध्या चर्चेत आला आहे. हनी सिंगच्या विरोधात पत्नी शालिनी तलवारने छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण कायद्यांतर्गत शालिनीने हनी सिंगविरोधात तक्रार नोंदवली आहे. हनी सिंग आणि शालिनीच्या लग्नाला जवळपास १० वर्षे झाली आहेत. शालिनीने हनी सिंग विरोधात तक्रार दाखल केली असली तरी यापूर्वी तिने अनेक सार्वजनिक ठिकाणी हनी सिंगची बाजू घेतली आहे.

२०१४मध्ये हनी सिंग ‘इंडियाज रॉ स्टार’ हा शो होस्ट करत होता. त्यानंतर अचानक तो इंडस्ट्रीमधून गायब झाला. याच शो मध्ये हनी सिंगची पत्नी शालिनी तलवार पहिल्यांदा सर्वांसमोर आली होती. त्यानंतर एका मुलाखतीमध्ये शालिनीला शाहरुख खानने ‘स्लॅम टूर’ दरम्यान हनी सिंगच्या कानखाली लगावली होती का? असा प्रश्न विचारण्यात आला होता.

आणखी वाचा : पत्नीमुळे हनीसिंग अडचणीत; दाखल झाला गुन्हा, दिल्लीतील कोर्टाने बजावली नोटीस

त्यावर उत्तर देत शालिनी म्हणाली, ‘शाहरुख त्याच्या कानशिलेत का लगावेल? या सर्व अफवा आहेत. हनी सिंग शाहरुखचा आदर करतो हे सर्वांना माहिती आहे. तसेच शाहरुखने आमची खूप मदत देखील केली आहे. डॉक्टरांनी हनीला देशा बाहेरील प्रवास टाळण्यास सांगितले होते. पण शाहरुखला वचन दिल्यामुळे तो स्लॅम टूरवर गेला होता.’

‘टूर वर असताना देखील तो ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेत होता. रिहर्सल करत असताना अचानक हनी पडला आणि त्याच्या डोक्याला लागले होते. त्यामुळे त्याला टूर सोडून परत यावे लागले. त्यामुळे शाहरुखने कानशिलात लगावली या सर्व अफवा होत्या’ असे शालिनी पुढे म्हणाली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Was honey singh slapped by shahrukh khan shalini talwar revealed the truth avb