#ThugsOfHindostanTrailer : आजादी बेच रहे है हम, भेटा हिंदोस्तानच्या ‘ठग्स’ ना

हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तो फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग’ या कादंबरीवर आधारित आहे.

thugs of hindostan
'ठग्स ऑफ हिंदोस्तान'

आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ, फातिमा अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे.  व्यापाराचं निमित्त करून भारतात आलेल्या इंग्रजांनी हळूहळू या देशाला गुलाम बनवलं. इंग्रजांच्या ताकदीपुढे सगळ्यांनीच माना टाकल्या मात्र काहींना ही गुलामगीरी मान्य नव्हती. गुलामगीरीची ही बंधनं  उखाडून फेकण्याच्या या युद्धाची झलक  ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या ट्रेलरमधून पाहायला मिळत आहे. एका बाजूनं इंग्रजाविरुद्ध लढणारा ‘आजाद’ म्हणजेच अमिताभ बच्चन आणि दुसरीकडे फितुर ‘फिरंगी’ म्हणजेच आमिर या दोघांची जुगलबंदी ‘ठग्स’मधून पाहायला मिळणार आहे.

हा चित्रपट येत्या ८ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तो फिलिप मेडोस टेलर यांच्या ‘कन्फेशन्स ऑफ अ ठग अँड द कल्ट ऑफ द ठगी’ या कादंबरीवर आधारित आहे. गेल्या आठवड्यातच या चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकेवरून पडदा उठला. अनेकांना बिग बी आणि आमिर खान नेमकी काय भूमिका साकारणार याचं कुतूहल होतं. अमिताभ या चित्रपटात ‘आजाद, ठग्सचा सेनापती’ ही भूमिका साकारत आहे. तर आमिर या चित्रपटात ‘फिरंगी’च्या भूमिकेत आहे. आमिरचा हा लूक ‘पायरेट्स ऑफ कॅरेबिअयन’मधल्या जॅक स्पॅरोच्या जवळ जाणारा आहे अशाही चर्चा होत्या.

लॉयड ओवेन हा खलनायकाच्या भूमिकेमध्ये झळकणार असून तो ईस्ट इंडिया कंपनीच्या एका अधिकाऱ्याची भूमिका पार पाडणार आहे. तर कतरिना सुरैय्याची भूमिका साकारणार आहे. हिंदी सोबतच तामिळ आणि तेलगू भाषेमध्येही हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच आमिर आणि अमिताभ बच्चन एकत्र काम करणार आहेत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Watch aamir khan amitabh bachchan thugs of hindostan trailer

ताज्या बातम्या