scorecardresearch

पाहाः दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश आणि अनिकेतच्या ‘पोश्टर बॉइज’चा ट्रेलर

हिंदी-मराठी सिनेसृष्टीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदेने निर्मिती केलेल्या त्याच्या ‘पोश्टर बॉइज’ या दुसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

हिंदी-मराठी सिनेसृष्टीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता श्रेयस तळपदेने निर्मिती केलेल्या त्याच्या ‘पोश्टर बॉइज’ या दुसऱ्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाची कथा सत्यघटनेवर आधारित असून यातून पुरुष नसबंदी हा विषय हाताळण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा ही तीन पुरुषांवर आधारित आहे. शासनाच्या नसबंदीसाठी आवाहन करणा-या एका पोस्टरवर या तिघांचा फोटो छापला जातो. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जो गोंधळ उडतो याचे विनोदी चित्रीकरण करण्यात आले आहे. ‘दिसत तसं नसतं म्हणून जग फसतं’ अशी चित्रपटाची टॅगलाइन आहे.     सर्वात महत्वाचे म्हणजे याआधीच चित्रपटाच्या लूकमध्ये ‘सिक्स पॅक अ‍ॅब्स’ने सर्वांना थक्क करणारे चतुरस्र व ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आता ते चक्क नाचतानाही दिसणार आहेत.     
दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव यांच्यासोबत ४८ कलाकारांच्या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. श्रेयस तळपदे निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘पोश्टर बॉइज’ १ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.     

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-06-2014 at 03:58 IST

संबंधित बातम्या