‘बॉईज ३’ हा चित्रपट १६ सप्टेंबरला प्रदर्शित झाला. प्रतीक लाड, पार्थ भालेराव आणि सुमंत शिंदे या त्रिकुटासह विदुला चौगुले या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. बॉईज आणि बॉईज २ या चित्रपटाचा हा सिक्वेल आहे. हे दोनही चित्रपट प्रचंड गाजले होते. ‘बॉईज ३’ देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बॉईज ३’ या चित्रपटात धैर्या, ढुंग्या आणि कबीर या त्रिकुटाला किर्तीने दिलेली साथ प्रेक्षकांना भावली आहे. प्रेक्षकांसह चित्रपटसृष्टी आणि समीक्षकांनीही या चित्रपटाला पसंती दर्शवली आहे. ‘बॉईज ३’ चित्रपटाची सोशल मीडियावरही तुफान चर्चा होताना दिसत आहे. शाळेपासून सुरु झालेला बॉईजचा हा प्रवास आता महाविद्यालयापर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यामुळे त्यांची तिप्पट झालेली धमाल प्रेक्षकांना अनुभवताना मजा येत आहे.

हेही वाचा >> “लोकलमध्ये मी नेलपेंट, लिपस्टिक विकायचे अन्…”, विशाखा सुभेदारने शेअर केल्या खडतर प्रवासातील आठवणी

‘बॉईज ३’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर ३ कोटींची कमाई केली. राज्यात ठिकठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफूल होत आहेत. आता या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांसाठी खास भेट आणली आहे. २३ सप्टेंबरला सर्वत्र राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा करण्यात आला. याच निमित्ताने ‘बॉईज ३’ चित्रपटाचे तिकिट १०० रुपयांत प्रेक्षकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. २६ ते २९ सप्टेंबर दरम्यान १०० रुपयांत हा चित्रपट सिनेमागृहांत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

हेही वाचा >> “ती माझ्या आयुष्यात आली आणि…”, अभिनेता संतोष जुवेकरची पोस्ट चर्चेत

हेही वाचा >> “लग्न करायचे म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने सांगितला ‘त्या’ चाहत्याचा भयानक किस्सा

एव्हरेस्ट एंटरटेनमेंटसह अवधूत गुप्ते प्रस्तुत ‘बॉईज ३’ या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले आहे. लवकरच ‘बॉईज ४’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची घोषणा ‘बॉईज ३’ च्या यशानंतर दिग्दर्शकांनी केली आहे. त्यामुळे आता ही धमाल चौपट बघण्यासाठी प्रेक्षकही आतुर आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch parth bhalerao sumant shinde pratik lad starrer boys 3 marathi movie in 100 rupees know the details kak
First published on: 26-09-2022 at 13:03 IST