'शुद्ध देसी रोमान्स' चित्रपटाचा आणखी एक टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. 'काय पो छे'चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारा सुशांत सिंग राजपूत, परिणिती चोप्रा आणि रिशी कपूर हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच, वाणी कपूर या चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असून तीसुद्धा मुख्य भूमिकेत आहे. जयदीप साहनी यांची पटकथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्माचे असून या चित्रपटाचा निर्माता आदित्य चोप्रा आहे. हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. पहा शुद्ध देसी रोमान्स चित्रपटाचा टीझर