scorecardresearch

पाहा शाहिदच्या ‘हैदर’ चित्रपटातील ‘बिस्मील’ गाणे

अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी हैदर चित्रपटातील बिस्मील गाणे प्रदर्शित झाले आहे. बॉलीवूड नृत्यशैलीत पारंगत असलेल्या खुद्द शाहिदला या गाण्याचे चित्रिकरण आव्हानात्मक वाटले होते

अभिनेता शाहिद कपूरच्या आगामी ‘हैदर’ चित्रपटातील ‘बिस्मील’ गाणे प्रदर्शित झाले आहे. बॉलीवूड नृत्यशैलीत पारंगत असलेल्या खुद्द शाहिदला या गाण्याचे चित्रिकरण आव्हानात्मक वाटले होते असे स्वत: शाहिदने म्हटल्याने त्याचे चाहते या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. हे गाणे आपल्या करिअरमधील सर्वोत्तम असल्याचेही शाहिदने म्हटले आहे.
‘बिस्मील’ या गाण्याचे चित्रीकरण काश्मीरमधील सुर्य मंदिर परिसरात करण्यात आले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणावेळी दररोज या मंदिर परिसरात तब्बल पाच ते सहा हजार लोक चित्रीकरण बघण्यास गर्दी करत असत. हिंसक वृत्तीचे वर्णन करण्यासाठी गाण्यात त्या प्रकारच्या रंगसंगतीचा फेसपेंट वापरण्यात आल्याचेही शाहिद म्हणाला.
‘बिस्मील’ गाण्यावर नृत्य करणार ‘शाहिद’ नसून ‘हैदर’ असल्याने त्याप्रकारे नृत्य करणे गरजेचे होते. त्यामुळे या गाण्यावरील नृत्य मला आव्हानात्मक वाटले. गाण्यात माझ्या रोजच्या नृत्यशैलीला बगल देऊन ‘हैदर’च्या भूमिकेशी जुळणारे नृत्य असणे गरजेचे होते आणि त्यादृष्टीनेच प्रयत्न करण्यात आले आहेत. असेही तो म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-08-2014 at 05:06 IST

संबंधित बातम्या