scorecardresearch

Premium

Sonu Nigam goes unrecognised पाहा: भिकाऱ्याच्या वेषातील सोनू निगम रस्त्यावर बसून गातो तेव्हा…

जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर बसून सोनू निगम गात होता.

Watch , Sonu Nigam , Sonu Nigam goes unrecognised as old street musician , Bollywood songs, golden voices in hindi cinema, Entertainment news, Loksatta, Loksatta news, marahti, Marathi news
Sonu Nigam : अनोळखी वेषातील सोनूने रस्त्यावर गायला सुरूवात केली तेव्हा त्याच्या सूरांनी अनेकांची पावले जागच्याजागी थबकली. अनेकजण त्याठिकाणी रेंगाळून सोनूचे गाणे ऐकत होते, काहीजणांनी त्याला भूक लागली आहे का, अशी विचारपूसही केली.

आजपर्यंत गायक सोनू निगम याने बॉलीवूड चित्रपटांमधील अनेक गाण्यांना आपल्या सुमधूर आवाजाचा साज चढवला आहे. मात्र, हाच सोनू निगम जर एखाद्या भिकाऱ्यासारखा रस्त्यावर गाण्यासाठी बसला तर काय होईल, याची कल्पना करून पाहा. अनेकांना ही कल्पना रूचणार नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंबईत हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. विशेष गोष्ट म्हणजे त्यावेळी सोनू निगमचा आवाज ऐकून त्याच्याभोवती बघ्यांची गर्दी झाली खरी, पण कोणीही सोनू निगमला ओळखू शकले नाही. या सगळ्याचा एक व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘द रोडसाईड उस्ताद’ असे शीर्षक असणारा हा व्हिडिओ ‘बिंग इंडियन’ या डिजिटल चॅनलतर्फे तयार करण्यात आला आहे. यामध्ये सोनू निगमला एका वयोवृध्द भिकाऱ्याच्या वेशात जुहू येथील वर्दळीच्या रस्त्यावर गाण्यासाठी बसविण्यात आले होते. मेकअप केल्यामुळे सोनू निगम एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीप्रमाणे दिसत होता. त्यामुळे कोणीही त्याला ओळखू शकले नाही. मात्र, अनोळखी वेषातील सोनूने रस्त्यावर गायला सुरूवात केली तेव्हा त्याच्या सूरांनी अनेकांची पावले जागच्याजागी थबकली. अनेकजण त्याठिकाणी रेंगाळून सोनूचे गाणे ऐकत होते, काहीजणांनी त्याला भूक लागली आहे का, अशी विचारपूसही केली. व्हिडिओच्या चित्रीकरणानंतर बोलताना सोनूने आपण लोकांच्या या प्रतिसादाने खूपच भारावून गेल्याचे सांगितले.

Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Watch sonu nigam goes unrecognised as old street musician

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×