मराठी सिनेमाने, सिनेसृष्टीने बरीच प्रगती केली आहे. मात्र पहिला मराठी बोलपट कोणता ? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ठाऊक आहे का? कुणी म्हणेल की राजा हरिश्चंद्र. मात्र राजा हरिश्चंद्र हा मूकपट होता. पहिला बोलपट होता अयोध्येचा राजा. या सिनेमात गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे यांच्या प्रमुख भूमिका होत्या.

हा सिनेमा आजच्याच दिवशी म्हणजेच ६ फेब्रुवारी १९३२ रोजी मुंबईत प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन ८८ वर्षे झाली आहेत. त्याच निमित्त आपण पाहुयात हा खास व्हिडीओ.